लोक न्यूज
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते शैक्षणिक वर्ष 2024 /25 मध्ये साने गुरुजी विद्यालयातील एकूण 26 विद्यार्थी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट झाले होते तरी सर्व विद्यार्थी चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण झाले त्यामध्ये 20 विद्यार्थी ए श्रेणी त उत्तीर्ण झाले तर सहा विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले तरी सदर विद्यार्थ्यांना आमच्या साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर श्री समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सदर यशा बद्दल आमच्या अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे व सर्व संचालक मंडळ व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले