लोक न्यूज
अमळनेर:-महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी घेत न्यू व्हिजन स्कूल चा नावलौकिकात भर घातली. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय शालेय गुणवत्ता परीक्षेत प्राथमिक स्तरातून मंथन परीक्षेत इयत्ता तिसरी चा विद्यार्थी मा.प्रणव यशवंत धनगर या विद्यार्थ्याने केंद्रात प्रथम स्थान मिळविले.
तर महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल च्या इयत्ता आठवीच्या तीन विद्यार्थ्यांनी मा. प्रणव बैसाणे,कु.प्रेरणा महाजन, कु. आयुषी धनगर व इयत्ता पाचवी चा मोहिद खान या चार विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत शाळेचे व आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक वाढविले. या सर्वच विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी, प्राचार्या,समन्वयक, शिक्षक व पालक वर्गातून कौतुक होत आहे.मा. प्राचार्या प्रेरणा पाटील यांनी आपल्या स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ही दिल्या. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. वैभव आढाव व श्री. अमोल पाटील यांचे ही अभिनंदन केले.
काल झालेल्या शालेय व्यस्थापन समिती ने ही या गोष्टी ची दखल घेत यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन शिक्षकांचे कौतुक केले. शाळेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या व मेहनत घेणाऱ्या सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.या विद्ध्यार्थ्याच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ शिरसाठ,सुमित्रा झाँजोटे, वंदना मराठे ,दिपाली राजपुत, बागुल सर,भाग्यश्री अमोदेकर, सॅम सर, विद्या पाटील,अमोल पाटील, दिपाली पाटील,अनिता पाटील,श्रद्धा भंडारी, कामिनी महाजन,मयूर पाटील, योगिता बोरसे, कल्याणी यादव, शितल साळुंखे, प्रथमेश बारी,दिपिका गोखलानी,दिपाली महाले,सोनल वानी, अंजली पाटील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.