लोक न्यूज
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.सर्व विद्यार्थी पदवी स्वीकारण्यासाठी निळ्या रंगाचा कोट व टोपी परिधान करून आले होते ग्रॅज्युएशन सोहळ्याची सुरुवात लहान चिमुकल्यांनी ग्रॅज्युएशन कपडे व टोप्या परिधान करून स्टेजवर चालताना केली.
           प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री उत्कर्ष पवार  यांनी आपल्या दीक्षांत संबोधनात या लहान पदवीधरांना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन दिले.त्याचबरोबर त्यांनी शिक्षण आणि इतर सह -अभ्यासक्रम उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले.
संस्थेच्या सचिव अलका पवार, प्राचार्य वर्षा सोहिते व संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा दीक्षांत समारंभ पार पडला. सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनीषा सोनार व स्वाती चव्हाण यांनी केले तसेच शिक्षिका संगीता पाटील यांनी नर्सरी ते सिनियर केजीच्या प्रवासाची माहिती दिली. आभार प्रदर्शन शिक्षिका योगिता फालके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका श्वेता सोनकुचरे,मनीषा ठाकूर, रोशनी महाजन,कविता पाटील, प्रतीक्षा पाटील आणि योगिता पारधी यांनी विशेष परिश्रम घेतले.
              हा खरोखरच केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठी एक आनंदाचा आणि संस्मरणीय दिवस होता.