लोक न्यूज
अमळनेर: सोशल मीडिया वर   आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्या समाज कंटकासह ग्रुप ऍडमिन वर देखील गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे अशा लोकांची माहिती तात्काळ द्या अशी सूचना वजा इशारा परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली. आगामी ईद आणि गुढीपाडवा रामनवमी या सणांच्या पार्श्वभूमीवर गांधलीपुरा पोलीस चौकीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
    बारबोले पुढे म्हणाले की "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"असा संदेश जगाला देणाऱ्या पूज्य सानेगुरुजींच्या अमळनेरात जातीय वाद व्हायलाच नको. दोन्ही बाजूला काही समाजकंटक असतांत त्यांना शांतता आवडत नाही,समाजकंटक असे प्रयत्न करत असतील तर करू द्या,मात्र आपण बळी पडू नका,दंगली मध्ये कुणाचाही फायदा होत नाही,याउलट समाजाचे नुकसान होते,प्रत्येक समाजात लहान मुले असतील त्यांची समजूत काढा,शहराचे जसे नाव होते तीच ओळख कायम राहू द्या,आम्ही बाहेरचे असताना जवाबदारी घेतो,तुम्ही तर याच गावाचे लोक असल्याने जवाबदारी घ्या,सर्व समाजाचे सण शांततेत होतील.काही अडचण असल्यास चर्चा करा,चर्चेतुन सर्व प्रश्न सुटतील अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
  ऍड शकील काझी,इम्रान खाटीक,आरिफ भाया आदींनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना शांततेचे आवाहन केले.
      यावेळी  सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र  पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव,मुक्तार खाटीक,सलीम टोपी, संजय पाटील , नरेश कांबळे , योगेंद्र बाविस्कर यासह आजी माजी नगरसेवक व  हिंदू मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.