लोक न्यूज
अमळनेर :   मराठा  समाज महिला मंडळातर्फे समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच याच वेळी मराठा समाज महिला मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी प्रा शीला पाटील यांची निवड करण्यात आली.
  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध प्रबोधनकार  रत्नमालाताई पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊंचे पूजन करून  उद्घाटन  करण्यात आले.  प्रास्ताविक करताना मंडळाच्या  मावळत्या अध्यक्ष तिलोत्तमा पाटील यांनी सांगितले की मला मंडळाची धुरा सांभाळायला आठ वर्षे पूर्ण झाली तरी यापुढे मराठा महिला मंडळाचे अध्यक्ष पदाचे काम सर्वानुमते प्रा.शीला पाटील यांच्याकडे मी सोपवित आहे, त्यांनी यापुढें मंडळाची ही धुरा सांभाळावी असे आवाहन केले.  तसेच उपाध्यक्ष म्हणून अलका विनोद पाटील व माधुरी पाटील यांची निवड करण्यात आली.
  प्रबोधनकार रत्नमाला ताईंनी सर्व संतांच्या कार्याचा आढावा घेतला संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील अभंगाचे रूपाने त्यांनी सविस्तर वर्णन केले. संत तुकारामांनी त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाची खूप मोठे काम केलेले आहे असे सांगून अनेक संतांच्या अभंगांचा उल्लेख  केला.      
कार्यक्रमासाठी सुलोचना पाटील,लीनापाटील, पद्मजा पाटील, मंगला पाटील, प्रभा पवार, रागिणी पाटील,  मनीषा पाटील यांनी परिश्रम घेतले.   भारती आक्का पाटील व  भारती पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.