लोक न्यूज-
 दि.6जानेवारी 2024, शनिवार, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वावडे येथे  बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. व्यावहारिक ज्ञान वाढवणे व खरेदी-विक्री व्यवहार कसे करायचे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केंद्राचे केंद्रप्रमुख दादासो श्री छगन पाटील यांनी भूषविले.  तसेच गावाचे प्रथम नागरिक सरपंच दादासो श्री राजेंद्र प्रल्हाद  पाटील, ग्रामपंचायत सदस्य भाऊसो श्री.राजेंद्र अभिमन पाटील  तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसो  श्री दिनेश माळी, शिक्षण प्रेमी भाऊसो श्री चंद्रकांत वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. श्री वसंत पाटील सर जवखेडे, पालक श्री दिनकर भटू पाटील, श्री गोरख बाजीराव पाटील, श्री राजेंद्र फकीरा पाटील, माता पालक सौ शीतल पाटील, सौ सरला पाटील, सौ किर्ती वानखेडे , सौ रेखा वाल्हे, सौ मोनाली धोबी व गावातील ग्रामस्थ तसेच पालक वर्ग,माता-भगिनी,  माध्यमिक विद्यार्थी वर्ग यांनी खरेदी विक्री व्यवहारात भाग घेऊन  कार्यक्रमाची शोभा वाढविली.. मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले, आलेल्या सर्व पाहुण्यांचे शिक्षक वृंदांनी स्वागत केले,तसेच मान्यवरांनी फीत कापून स्टॉल चे उदघाटन केले. मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देऊन  विद्यार्थ्यांसोबत खरेदी विक्रीचे व्यवहार केले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाकीजा पिंजारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील,शिक्षकवृंद श्रीमती संगीता सोनार, श्रीमती अनिता बिऱ्हाडे, श्रीमती कविता खैरनार यांनी परिश्रम घेतले..