लोक न्यूज-
अमळनेर -येथील मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल मध्ये दिनांक 05 व 06 जानेवारी 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या भव्य प्रांगणात मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरे झाले. 
        ग्लोबल स्कुल मध्ये नेहमीच नाविन्याचा शोध घेतला जातो. त्यानुसार यंदा देखिल नवनवीन भरगच्च संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकमाचे प्रमुख पाहुणे मंत्री नामदार  अनिल भाईदास पाटील (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व पालकमंत्री नंदुरबार, महाराष्ट्र राज्य, मुंबई) हे उपस्थित होते. स्नेहसंमेलनाची सुरवात दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाली. यावेळी संस्थेचे फाउंडर मेंबर  गोविंददादा मुंदडा, अध्यक्ष  प्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ छाया मुंदडा, सचिव  अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा,पंकज मुंदडा, अॅडव्हायजरी अभिनय मुंदडा, सुनिल शेठ, सर्व पदाधिकारी, प्राचार्य  लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या लक्ष्मण, उपस्थित होते.
       कार्यकमात प्रि-नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हे विशेष. स्नेहसंमेलन म्हणजे विद्याथ्यांच्या कलागुणांसाठी उपलब्ध असलेले महत्वाचे व्यासपीठ, स्नेहसंमेलनात आपल्या पाल्यास कलागुण सादर करतांना पाहुन पालकांचा आनंद व्दिगुणीत होतांना दिसला, या वर्षी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन नाटीका, दुर्गापुजा, रामायण, महाभारत, डोंबारी नृत्य, कोळीनृत्य, रासलिला, शिवनृत्य, भांगडा, गरबा, शिवाजी महाराजांचे "वेडयात मराठे वीर दौडले सात" हे व तानाजीवर आधारीत नृत्य प्लस नाटीका, ब्रिटीशांच्या कुटनितीवर आधारीत नाटीका, तसेच प्रि-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो व प्रायमरी सेकंडरीच्या विद्यार्थ्यांच्या खलनायक या थीमवर आधारीत अतिशय सुंदर फॅशन शो ने, हॉरर शो अशा विविध प्रकारच्या सुंदर कार्यकमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेतले
       मुकनाटय, स्वच्छभारत अभियान, शेतक-यांवर आधारीत मराठी नाटीका आणि प्रि-प्रायमरीच्या विद्याथ्यांचे योगानृत्य व मोबाईलच्या आहारी गेल्यावर काय दुष्परिणाम होतात यावर आधारीत नाटीकेव्दारे प्रेक्षकांना सामाजिक संदेश देण्यात आला. या सोबतच इतरही अनेक सादरीकरण उत्कृष्टरीतीने सादर करण्यात आले.वर्षभरात झालेल्या विविध किडास्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर, विभागीय स्तर व राज्यस्तरावर झाली त्या विद्याथ्यांना तसेच इतर कॉम्पेटेटीव्ह परीक्षे मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना व इयत्ता 10 वी मध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय आलेल्या व विषयानुसार प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख स्वरूपात बक्षीसे देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी स्नेहसंमेलनाचे औचित्यसाधुन पालकांसाठी जी.के व सेल्फी अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला त्यातुनच प्रत्येकी तीन स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आले.
      कार्यकमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक  राकेश शर्मा, शिक्षिका सौ. संगिता पाटील, सौ. योगेश्वरी पाटील शाळेतील विद्यार्थीनी रिया मनोरे, गुंजन पाटील, प्रचिती मुंदडा, अक्षरा बेलदार, स्वरा भोसले, जान्हवी पाटील, अरोही पाटील, देवेश कटारीया व कृष्णा पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ विद्या लक्ष्मण, प्रि-प्रायमरी कोऑडीनेटर श्रीमती योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.