वैजापूर-लोक न्यूज
 राज्यात १जानेवारी ते १५फेब्रुवारी २०२४या कालावधीत  राज्यभर "मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा "हा उपक्रम राबविण्यास आरंभ झालेला आहे,याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या"पीएमश्री"योजनेत जिल्हयात एक नंबर ठरलेली शाळा पीएमश्री मौलाना आझाद विद्यालय,नगर पालिका या शाळेच्या वतीने शनिवार(ता,१३)रोजी जन जागृती अंतर्गत विद्यार्थी,शिक्षक व पालकांची एक फेरी काढण्यात येऊन "मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा"ची जनजागृती करण्यात आली, या पीएम श्री शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील व पर्यवेक्षक एम, आर,गणवीर यांच्या उपस्थितीत माजी शिक्षणाधिकारी तथा स्वच्छतादूतधोंडीरामसिंह राजपूत यांनी उपस्थित पालक,शिक्षक,विद्यार्थी यांना "मुख्यमंत्री माझी शाळा-सूंदर शाळा"करण्यासाठी प्रतिज्ञा देऊन संकल्प सोडला, या उपक्रमात स्वच्छता करणे,वृक्षारोपण, मेरी
माटी -मेरा देश,आरोग्य तपासणी,विद्यार्थी शंभर टक्के
,उपस्थिती, माझी शाळा-माझी परस बाग हा अभिनव उपक्रम निर्मिती, विविध क्रीडा स्पर्धा आयोजन, गुणवत्ता मार्गदर्शन, विद्यार्थी गुणवत्ता उंचावणे,माझी वसुंधरा अभियान,पाणी अडवा-पाणी जिरवा,जागृती,विविध शालेय स्पर्धा,महावाचन महोत्सव, विद्यार्थ्यांत सार्वजनिक स्वच्छता जागृती,विद्यार्थ्यांत शेती विषयी गोडी निर्माण व्हावी असे उपक्रम काटेकोरपणे येणाऱ्या४५दिवस राबविण्याची प्रतिज्ञा धोंडीराम राजपूत यांनी सर्व उपस्थिताना दिली ,या प्रसंगी शिक्षिका राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे,ज्योती दिवेकर,से,नि, केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील,संदीप शेळके,श्री रावकर,श्रीमती वैशाली शेलार यांच्या सह पालक,विद्यार्थी उपस्थित होते.प्रतिज्ञा देत असतांना माजी शिक्षणाधिकारी धोंडीराम राजपूत,नीता पाटील,एम, आर,गणवीर,राजेंद्र पाटील