लोक न्यूज-
खेलो इंडीया स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात दिनेश बागडे यांनी अमळनेर चा झेंडा रोवला. मस्सल्स फॅक्टरी जिम चे ट्रेनर किशोर भाऊ महाजन यांनी जल्लोष व्यक्त करत अभिनंदन केले. काही वर्षापूर्वी दिनेश बागडे यांचा अपघात झाला होता. त्या रेल्वे अपघातात त्याला पाय गमवावे लागले. त्यावेळी दिनेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अशा वेळी अचानक त्याच्या समोर उभे राहिलेल्या या संकटाचा सामना त्याने अतिशय संयमाने केला. निराश न होता परीस्थितीला सामोरे जाण्याचे ठरवले. संघर्ष ज्याच्या आयुष्यात तोच भविष्य घडवतो ज्या पद्धतीने अपघातातून सावरून त्याने पुन्हा स्वतः चे शारीरिक अपंगत्वावर मात करत ट्रेनिंग घेतले.आईवडिलांचा आशीर्वाद व अमळनेर कराचे प्रेम किशोर महाजन सारखा मित्र ट्रेनर असेल तर दिनेश ला कोणीही हारवू शकत नाही. हे खरे ठरले आणि दिनेश आता दिल्लीत खेळणार महाराष्ट्र चा झेंडा दिल्लीत फडकणार व अमलनेर चा आवाज बुलंद होणार... दिनेश चा हौसला वाढवण्यासाठी आपण आशीर्वाद रुपी सदिच्छा देऊ या.... मसल्स फॅक्टरी जिम ला आशीर्वाद रुपी सदिच्छा देणारे मा.डाॅ योगेश महाजन , अध्यक्ष परीश्रम दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळा पारोळा , महेंद्र भाऊ महाजन ( कुबेर ग्रूप ) व डाॅक्टर दिनेश महाजन ( मौर्या हॉस्पिटल) दादासो विक्रांत पाटील व स्वप्निल पाटील सर , दर्शना ताई पवार माईंड पार्लर यासह अमलनेर मधील नेहमीच पाठराखण करणारे पत्रकार व समाजातील मान्यवर यांचेही आभार किशोर भाऊ महाजन यांनी मानले. सर्वांना दिपावली च्या हार्दिक शुभकामना

