लोक न्यूज-
तालुक्यातील सर्वात मोठा भष्ट्राचार उघडकीस आणत आहे या सर्व प्रकरणांची चौकशी झाली तर या घोटयाळयाची/ भष्ट्राचाराची व्याप्ती शेकडो कोटीच्या वरती जावू शकते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर दरोडा टाकून लुटण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त अमळनेर तालुक्यातच करोडो रुपये सदर दलाल शेतकऱ्यांचे रक्त शोषण करणारे व कृषी विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांच्या संगनमताने झालेला आहे. जसे की,
१) शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या सुमारे ४ हजार कोटी रुपये अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. त्याला पोखरा स्किम पण संबोधतात.

२) या योजनेअंतर्गत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेत जमिनीवर शेडनेट उभारणी केली असुन त्याबाबतच्या त्यांच्या झालेल्या फसवूणक तसेच आर्थिक व्यवहारामध्ये अफरातफर व त्यांना उभारणी करतेवेळी दिलेले निकृष्ठ दर्जाचे साहित्य पुरवून फसवणूक केली तसेच वेळोवेळी संबंधीत उभारणी केलेले ठेकेदार व अशोक आधार पाटील विद्यमान सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ह.मु. धुळे व त्यांचा शालक समाधान शेलार ह.मु. अमळनेर ओम अॅग्रो GM ग्रीन हाऊस कंपनीचे मालक उध्दव पाटील सोनेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे व पार्टनर व काही कृषी विभागातील संबंधीत कर्मचारी बँक कर्मचारी यांनी आम्हाला फसविले आहे व आर्थिक लुट मानसिक त्रास तसेच दमदाटी व मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत.

पत्रकार परिषेदेत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी मांडले सविस्तर कथन...

१) कैलास दगा पाटील रा. मौजे फापोरे खु. ता. अमळनेर गट नं. १०१ / १/अ/२ व १०१ / १/६/२, या क्षेत्रामध्ये २० गुंठयांची पूर्व संमती अमळनेर कृषी विभागने दिलेली होती सदर क्षेत्रावर त्यांनी आमची फसवणूक करुन २० गुठयांऐवजी ४० गुठयांचे कर्ज १८ लाख ६० हजार मंजुर करुन घेवून त्यांनी त्यांच्या पार्टनशिप कंपनीच्या खात्यावर बँकेतुन परस्पर मला माहिती न पुरवता व डुप्लीकेट सहया करुन सदर रक्कम वर्ग करुन घेतली.

तसेच श्री. अशोक आधार पाटील रा. लोण खुर्द ता. अमळनेर ह. मु. धुळे, श्री. समाधान शेलार रा. अमळनेर व त्यांच्या सोबत असलेले श्री. उध्दव पाटील (ओम अॅग्रो व जी. एम. ग्रीन हाऊस कंपनीचे मालक) रा. सोनेवाडी ता. शिंदखेडा ह. मु. धुळे यांनी माझी फसवणूक केली. मला आलेले
शासकीय अनुदान शेडनेट कर्ज खात्यावर जमा करण्यात आले. तरी देखील माझ्यानावावर आजही
पंजाब नॅशनल बँकेचे १३ लाख रुपये वजा दाखवित आहे.

२)दिनेश दगा पाटील, रा. मौजे फापोरे खुर्द ता. अमळनेर येथील गट नं. ११४/१ अ या क्षेत्रामध्ये ४० गुंठयांची पुर्व संमती अमळनेर कृषी विभागने दिलेली होती सदर क्षेत्रावर त्यांनी आमची फसवणूक करुन ४० गुंठयाऐवजी २० गुंठे शेडनेट उभारणी करुन ४० गुठयांचे कर्ज १८ लाख ६० हजार मंजुर करुन घेवून त्यांनी त्यांच्या पार्टनशिप कंपनीच्या दलाल श्री. अशोक आधार पाटील रा. लोण खुर्द ता. अमळनेर ह.मु. धुळे, श्री. समधान शेलार रा. अमळनेर व त्यांच्या सोबत असलेले श्री. उध्दव पाटील (ओम अँग्रो व जी. एम. ग्रीन हाऊस कंपनीचे मालक) रा. सोनेवाडी ता. शिंदखेडा ह. मु. धुळे यांनी माझी फसवणूक केली. मला आलेले शासकीय अनुदान शेडनेट कर्ज खात्यावर जमा करण्यात आले. तरी देखील माझ्यानावावर आजही पंजाब नॅशनल बँकेचे १३ लाख रुपये वजा दाखवित आहे.

३)यशोदाबाई उखडू पाटील रा. कन्हेरे ता. अमळनेर माझ्या नावे मौजे फापोरे खुर्द ता. अमळनेर येथील गट नं. ११६ मध्ये या क्षेत्रामध्ये २० गुंठयांची पूर्व संमती अमळनेर कृषी विभागाने दिलेली होती. सदर क्षेत्रावर आमची फसवणूक करुन २० गुंठयांऐवजी ४० गुंठ्यांचे शेड नेट उभारणी करुन ४० गुठयांचे कर्ज १८ लाख ६० हजार मंजुर करुन घेवून त्यांनी त्यांच्या पार्टनशिप कंपनीच्या खात्यावर बँकेत परस्पर मला माहिती पुरविता व डुप्लीकेट सहया करुन सदर रक्कम वर्ग करुन घेतले.
तसेच श्री. अशोक आधार पाटील रा. लोण खुर्द ता. अमळनेर ह.मु. धुळे, श्री. समधान शेलार रा. अमळनेर व त्यांच्या सोबत असलेले श्री. उध्दव पाटील (ओम अँग्रो व जी. एम. ग्रीन हाऊस कंपनीचे मालक) रा. सोनेवाडी ता. शिंदखेडा ह. मु. धुळे यांनी माझी फसवणूक केली. मला आलेले शासकीय अनुदान शेडनेट कर्ज खात्यावर जमा करण्यात आले. तरी देखील माझ्यानावावर आजही पंजाब नॅशनल बँकेचे ११ लाख ८२ हजार रुपये वजा कर्ज दाखवित आहे.

४)नारायण रघुनाथ पाटील वय ४० वर्षे माझ्या नावे मौजे फापोरे खुर्द ता. अमळनेर येथील गट नं. ४८ क्षेत्रामध्ये ४० गुंठयाची पूर्वसंमती अमळनेर विभागाने दिलेली होती. सदर क्षेत्रावर त्यांनी आमची फसवणूक करुन ४० गुठयांची शेडनेट उभारणी करुन नियमाप्रमाणे मोजमाप करुन ४० गुठयांची कर्ज १८ लाख ६० हजार रुपये कर्ज माझ्या खात्यावरुन अशोक आधार पाटील यांनी रक्कम टाकून कोरा रकाना कोरा चेक घेवून गेले सदर चेक कमलबाई उमाकांत पाटील यांच्या नावाने चेकची रक्कम ५ लाख रु. काढण्यात आली नंतर साडेआठ लाख रुपये श्री. उध्दव पाटील यांच्या पत्नी नावे बडोदा बँकेतून आर. RTGS केले. मला जे शासकीय अनुदान मिळाले त्यापैकी रक्कम व वैयक्तिक रक्कम माझ्या कर्ज खात्यात जमा केले. तरी देखीली माझ्या नावे रु. र. १२ लाख रु. कर्ज दाखविले जात आहे.
करुन दिलेले शेडनेट व त्यांच्यामध्ये वापरलेले मटेरीयल अंत्यत निकृष्ट दर्जाचे असुन त्यात नामाकिंत कंपन्यांचे नसुन तसेच भारतीय BIS हे प्रमाणित नसुन लोकल दर्जाचे गॅलोनाईज पाईप, नायलॉन जाळी, त्याला लागणारे साहित्य फोगर सिस्टीम, मोटारी, व इत्यादी इस्टेमेंट प्रमाणे नसुन संपुर्ण शेडनेट हे दिड ते दोन लाखामध्ये उभारले असल्याचे आम्हाला नंतर कळले. यासर्व बाबींमध्ये कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी मंडळ, विभागीय कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी योग्य ती तपासणी व मार्गदर्शन न केल्याने म्हणजेच कर्तव्यात कसुर किंवा या दलालांकडून मोठी रक्कम घेवून आमची या दलालासोबत मिळून आम्हाला फसविले तसेच बँकेतील काही कर्मचारी यांना हाताशी धरुन आमचे परस्पर बँक खात्यातून पैसे वटविले त्यामुळे आम्ही या शेडनेट मधून आम्हाला काही उत्पन्न तर झालेच नाही आम्हाला मानसिक त्रास झाला शेतीवर बोजा चढला यामुळे आम्हाला कुठलेही कर्ज मिळत नाही. घरातील परिस्थिती व कौटूबिक मानसिक त्रास वाढत चालला आहे कधीकधी आम्हाला असे वाटते की, जिवन संपवून टाकावे आम्ही त्यांना आमचे पैसे किंवा फसवणूक बाबतची वेळोवेळी विचारणा केली असता आम्हाला शिवीगाळ मारुन टाकयच्या धमक्या देत असतात.

तरी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आजची पत्रकार परिषद समोर सत्य कथन करीत आहोत.