पत्रकारांच्या जागृकतेने लोकशाही शासन टिकून आहे (राष्ट्रीय पत्रकार दिन--१६नोव्हेंबर)
भारतीय लोकशाही शासन प्रणाली अधिक प्रभावशाली ,लोकाभिमुख व पारदर्शी करून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य देशातील वर्तमान पत्र व देशातील पत्रकार करीत आहेत,लोकशाही शासन प्रणालीतील चुकीची धोरणे,चुकीचे निर्णय,नागरिकांच्या हक्क व कर्तव्याला
बाधक ठरणाऱ्या बाबी,समाज विघातक व राष्ट्र विघातक बाबी आपल्या लेखणीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून त्या देशातील नागरिकांसमोर आणण्याचे काम वर्तमान पत्र व पत्रकार अत्यंत प्रभावीपणे मांडून लोकशाही अबाधित राखण्याची भूमिका पत्रकार मंडळी पार पाडतात, आणि म्हणूनच
वर्तमान पत्रांना लोकशाही शासन प्रणालींचा चौथा आधारस्तंभ म्हणतात,सद्य स्थितीत देशातील विविध बोगस प्रकरणे ,घोटाळे, भ्रष्टाचार, अनितीची कामे देशातील पत्रकारांनी अत्यंत निर्भीडपणे व रोख ठोक पणे मांडून आपल्या पत्रकारितेचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे,आजच्या सामाजिक, राजकीय तथा प्रशासनिक स्थितीची ईतभूत  माहिती तसेच शासन व  प्रशासना तील अधिकारी व पदाधिकारी यांच्या कृष्ण कृत्यांना जनतेसोर ठेवण्याचे काम ही पत्रकारच चोखपणे बजावतात,त्यांच्या चांगल्या व लोकहिताच्या कामांना ही प्रसिद्धी देणाची भूमिका पत्रकार बजावतात,
समाजातील व समाजाच्या विविध क्षेत्रातील चांगल्या व वाईट घटना संकलित करून त्याही वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकारिता अत्यंत महत्वपूर्ण होय,
पत्रकारला समाजातील व देशातील अत्यंत जागरूक घटक म्हटल्या जाते, पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना पुढील काही बाबी पाळणेही गरजेचे आहे,  पत्रकारांनी वृत्त संकलन  करताना त्या वृत्ताचे सामाजिक व भावनिक परिणाम या बाबत सदैव जागरूक असणे गरजेचे आहे,  पत्रकारांनी जागरूकता, अभ्यासूपणा,निपक्षपा,अभ्यासूपणा,निपक्षपातीपणा,आपल्या कर्तव्यात पारदर्शकपणा पाळण्याची गरज आहे,निर्भीड पत्रकारिता श्रेष्ठ पत्रकारिता समजल्या जाते,पत्रकारांनी सामाजिक सलोखा व सामाजिक सामंजस्य टिकविण्यासाठी आपल्या लेखणीचा वापर करावा,समाजात नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी निःपक्षपाती लेखणी वापरावी, पत्रकारांनी क्षणोक्षणी व पदोपदी
अति दक्ष राहून अन्यायी व अत्याचारी बाबींवर सातत्य पूर्ण लिखाण करून समाजाला व नागरिकाना न्याय देण्याचे काम करावे अशी अपेक्षा आहे, पत्रकारिता करीत असताना अनेक प्रकारची प्रलोभने   त्यांच्या समोर ठेवली जातात अशा समयी त्यांनी या प्रलोभाना  बळी न पडता रोखठोक व प्रामाणिकपत्रकारितेचे दर्शन घडवावे अशी अपेक्षा आहे, पत्रकारांनी भेदाभेद,आकसपणा, बाळगू नये,मतभेद जरूर असावे परंतु आकसवृत्ती नसावी, जे पत्रकार व जे वृत्तपत्र निर्भीड,पारदर्शी, निःपक्षपाती, व रोखठोक पत्रकारिता करतात त्यांचे समाजमनात अत्यंत उच्च स्थान असते,शासनाने देशातील सर्व थरावरील वृत्तपत्र व पत्रकारांना संरक्षण हमी देण्याची नितांत गरज आहे, पत्रकार संरक्षण कायदा कडक हवा,पत्रकारांना घरकुल,पत्रकार भवन,प्रवास सवलत,वैद्यकीय मोफत सेवा ,त्यांच्या मुलाबाळांना शैक्षणिक सुविधा इत्यादी सवलती द्याव्यात व  लोकशाही च्या या चौथ्या आधारस्तंभला सन्मानाचे स्थान  द्यावे अशी या राष्ट्रीय पत्रकार दिनी अपेक्षा आहे,
धोंडीरामसिंह ध राजपूत,वैजापूर जि,औरंगाबाद