लोक न्यूज-
दुर्मीळ मंदिर कार्तीक स्वामींची, अंतुर्ली ता. अमळनेर जि. जळगांव येथे मौजे अंतुर्ली ता. अमळनेर महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मंदिरांपैकी एक असे कार्तीक स्वामीचं मंदीर,
अंतुर्ली ता. अमळनेर जि. जळगांव येथे आहे.
या मंदीराची यात्रा. रविवार दि.26/11/ 2023 रोजी कार्तीक पौर्णीमा / कृत्तीका नक्षत्राच्या अंत्यत शुभ अशा तिथीवर भरणार आहे. याच तिथीवर दुपारी कार्तीक स्वामी स्नान समाप्तीचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हया तीर्थाच्या बाबतीत अशी अख्यायिका आहे की भगवान महादेवाचे पुत्र श्री. गणपती व श्री. कार्तीक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास निघाले असता थोरला पुत्र गणपती यांनी आई-वडीलांनाच प्रदक्षिणा घातली
व देवत्व प्रापत करुन घेतले.
पण कार्तीक स्वामी आपले वाहन मोर सोबत घेवून पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास निघाले असता सर्व प्रवास नदी व नाले या मार्गानेच पुर्ण केला. प्रवासात अंतुर्ली येथील टेकडीवर कार्तीक स्वामी काही क्षण विश्रांतीसाठी थांबले होते अशी अख्यायिका आहे. म्हणून प्रत्यक्ष स्वामींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या मोरांची नगरी अंतुर्ली येथील तिर्थक्षेत्राला अपरीमीत असे महत्व प्राप्त झालेले आहे.
या बाबतीत अशी कथा आहे की, इ. सन १६३५ मध्ये कै. रामराव पाटील नामक सदगृहस्थांच्या स्वप्नात येवून स्वामींनी दृष्टांत दिला होता की, मी स्वतः अंतुर्ली येथील टेकडीवर काही काळ विश्रांतीसाठी थांबलो होतो. ही सर्व हकीकत पाटलांनी गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी त्या जागेवर दिवा लावण्यास सुरुवात केली. नंतर इ. सन १६५२ साली म्हणजे स्वराज्यांचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात त्या टेकडीवर लहानेस स्वामींचे मंदिर बांधले होते व सर्व गावातील व्यक्ती (महिला सोडून) दररोज सकाळ, संध्याकाळ दर्शनासाठी जात असत.
मागील १० ते १२ वर्षा पासून गावकऱ्यांनी या जागेवर मोठे असे मंदिर उभारुन जिर्णोध्दार केला आहे. प्रत्यक्ष स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तिथीस कृर्तीका नक्षत्रावर स्वामींचे दर्शन स पत्नीक घेतल्यास सात जन्म धनवान राहतो अशी कथा आहे. म्हणून पती व पत्नी दोघांनी सोबत दर्शन घेण्याची पध्दत आहे.
कार्तीक स्वामी जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा घालुन आई-वडिलांजवळ परतले तेव्हा त्यांना कळले की, श्री. गणपतींनी पृथ्वी प्रदक्षिणा न घालता आई-वडील यांनाच विश्व मानुन प्रदक्षिणा घातली. या गोष्टीचा कार्तीक स्वामींना राग आला व रागातच घरुन निघुन गेलेत. निघतांना शाप दिला की जर माझ्या जन्म तिथी व्यतिरिक्त कोणी महिलेने माझे दर्शन घेतले तर ती सात जन्म विधवा होईल. अशी माहिती पुर्वर्जानी दिली आहे.
त्यामुळे या तिथीवर दर्शन घेणाऱ्यांची खुपच गर्दी असते. कारण या तिथीवर स्वामी बाल्य अवस्थेत असतात. यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक आलेल असतात. संस्थान व गावकऱ्यांतर्फे भाविकांसाठी मंडपाची व पिण्यासाठी R.O. पाण्याची व्यवस्था केलेली असते. तसेच प्राथमिक आरोग्य (वैद्यकिय सेवा) देखील यात्रेत उपलब्ध असते. तसेच यात्रेत विविध संसार उपयोगी वस्तु व खेळयाचे स्टॉल, पाळणे देखील मोठया प्रमाणात लागलेले असतात.
मारवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी योग्य तो बंदोबस्त ठेवतात. सोबत गावातील तरुण स्वयंमसेवक, संस्थानचे सदस्य, गावकश्री देखील मोठया प्रमाणात मदतीसाठी असतात. तसेच ग्राम पंचायतीचे सहकार्य लाभते.
तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने व संस्थान च्या वतीने अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी विनंती केली आहे.
टिप- अमळनेर सुभाष चौक येथून ते अंतुर्ली पर्यत ये-जा करण्यासाठी खाजगी वाहन सुरु असतात.



