वैजापूर-लोक न्यूज
देशाचे दैवत असलेले व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, वैद्यकीय, उद्योग, कला,साहित्य,नृत्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३५ व्यक्तींना येथील जिजाऊ सेवा भावी संस्थाच्या वतीने
 जिल्हा पोलीस पाटील संघ चे सचिव सूर्यकांत पाटील
मोटे यांच्या वतीने रविवार(ता,२६)रोजी येथील सुभद्रा लान येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापूरचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे होते,तर  प्रमुख उपस्थितीत मुंबई च्या सिने कलाकार अभिनेत्री उर्मिला डांगे ,दौंड येथील बाजीराव घोरपडे, जेष्ठ साहित्यक धोंडीरामसिंह राजपूत, सचिव संतोष दोडे,व ऍड धनराज अंभोरे व आयोजक सूर्यकांत मोटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आरंभी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले,प्रास्ताविक सूर्यकांत मोटे यांनी केले बाल कलाकार नमस्वी मतसागर, सरगम त्रिभुवन यांनी नृत्य
सादर केले तर कार्तिक जगताप, गायत्री चव्हाण ,बाजीराव घोरपडे, श्रीमती पानसरे यांनी मनोगत व्यक्त
केले,कौठळे व अभिनेत्री उर्मिला डांगे यांनी उपस्थितीताना संबोधित केले,केदार मोटे,श्रद्धा मोटे,सुरेखा मोटे,अविनाश चव्हाण यांनी सहभाग नोंदविला, या प्रसंगी ज्योती ताई (धुळे)मनीषा(दौंड)
शबाना शेख यांची ही उपस्थिती होती,सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले आभार मोटे पाटील यांनी मानले.