लोक न्यूज-
वैजापूर येथील नगरपालिकेच्या वैजीनाथ वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ,ए, पी,जे,अब्दुल कलाम यांना जेष्ठ वाचकांनी रविवार(ता,१५)रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन केले व वर्तमानपत्र सोबत पुस्तके वाचून "वाचन प्रेरणा"दिन संपन्न केला,माजी शिक्षणाधिकारी तथा स्वच्छता दूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी उपस्थिताना डॉ,कलाम विषयी व वाचन विषयी माहिती सांगितली,या प्रसंगी ग्रंथपाल एम,आर,गणवीर,सहायक संजय राजपूत यांची उपस्थिती होती,जेष्ठ वाचक सी,पी,शेख,इकबालसिंग खनिजो,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकम,से,नि,अभियंता बबनराव क्षीरसागर, सुदाम आप्पा गोंधळे, सुभाष चाफेकर, पी,आर, रंधे, व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
