लोक न्यूज-
माहिती अधिकार सप्ताह दिनांक ६ ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दरवर्षी साजरा केला जातो .माहिती अधिकार सप्ताह च्या शेवटच्या दिवशी मा आयुष प्रसाद ,जिल्हाधिकारी ,जळगाव यांना प्रा.अशोक पवार यांचे नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन देण्यात आले याप्रसंगी अमोल कोल्हे, सचिन धांडे, उज्वल पाटील ,अजय मनुरे ,नीलू इंगळे, विद्या झनके ,विमल वाणी, मदन कर्डिले उपस्थित होते .12 ऑक्टोंबर 2005 पासून केंद्राचा माहिती अधिकार कायदा लागू होऊन आज 18 वर्षे झाली ,हा कायदा अधिनियमित झाल्यापासून १२० दिवसांच्या आत कलम चार (एक)(ख )चे एक ते सतरा मुद्दे प्रसिद्ध करणे व त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशाने अद्ययावत करणे अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते की जळगाव जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच विभागांनी माहिती अधिकार कलम 4 ची माहिती तयार केली नाही. माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म.जिल्हाधिकारी यांना शासनाने नोडल अधिकारी म्हणून घोषित केले आहे ,आज पर्यंत सामान्य प्रशासनाने , माहिती आयुक्त यांनी ,केंद्र सरकारच्या प्रशिक्षण विभागांनी कलम चार प्रसिद्ध करण्यासाठी 13 परिपत्रके काढली परंतु प्रशासनाने त्यांना केराची टोपली दाखविली .आदेशांचे पालन केले नाही त्यामुळे सामान्य जनतेला विविध विभागांची माहिती मिळू शकली नाही. 

              कलम चार ची माहिती स्वयंप्रेरणे प्रसिद्ध करावयाची असते, त्यासाठी अर्ज करावा लागत नाही. शासनाचे अधिकारी ,कर्मचारी यांचे प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च झाले परंतु माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी पाहिजे तशी होत नाही मा. जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व विभागांना कलम 4 ची माहिती तयार करून प्रसिद्ध करण्यासाठी आदेशित करावे व कलम चार प्रसिद्ध न करणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांवर कठोर कारवाई करावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे . याप्रसंगी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याशी सविस्तर चर्चा झाली .त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला  या कामात माहिती अधिकार प्रशिक्षकांचेही सहकार्य घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 मा. आयुष प्रसाद ,जिल्हाधिकारी, जळगाव यांना माहिती अधिकार संदर्भात प्रा अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले याप्रसंगी सचिन धांडे ,अमोल कोल्हे, उज्वल पाटील, अजय मनोरे, निलू इंगळे, विद्या झ नके ,विमल वाणी, मदन कर्डिले उपस्थित होते