लोक न्यूज-
दिनांक 15/10/2023 रोजी सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय पाडसे ता.अमळनेर जि. जळगांव येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती निमित्त *वाचन प्रेरणा* दिवस साजरा करण्यात आला.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री भरत रामदास कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी समवेत डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे वाचन केले.तसेच श्री बी.आर.पाटील सर श्री.व्ही.बी.पवार सर यांनी मनोगत व्यक्त केले.व शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री भरत रामदास कोळी सरांनी डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी *"वाचन प्रेरणा"* दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले,तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार,वाचन संस्कृती कशी वृद्धिंगत करता येईल,याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच *"जागतिक हात धुवा दिवस"* निमीत्त विद्यार्थ्यांना स्वछतेचे महत्त्व सांगून सगळ्यांचे हात साबणाने स्वच्छ करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.के.एल.पाटील सरांनी केले.कार्यक्रमाचा शेवट श्री एम.व्ही.पाटील सरांच्या आभार प्रदशनाने करण्यात आला.

