लोक न्यूज-
अमळनेर : भडगाव येथील अत्याचार ग्रस्त मयत बालिकेच्या कुटुंबाच्या मदतीला अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप धावला आहे. अपंग वडिलांना आर्थिक मदत करून आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार
भडगाव येथील बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याने तिचे कुटुंब प्रचंड दुःखात आहे. बालिकेच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून ते अपंग आहेत. त्यांचा रोजगार बुडाला आहे. अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप च्या अध्यक्ष ॲड ललिता पाटील , अनिता पाटील , डॉ प्रतिभा मराठे यांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन तातडीची आर्थिक मदत केली असून आरोपीस कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देखील त्या कुटुंबाला दिले आहे.
