लोक न्यूज-
अमळनेर नगर परिषद हद्दीतील मुंदडानगर लगतच्या ओम शांती नगर येथील खुला भूखंड गट क्र.१४३७ वरील नगर परिषद निधीतून होणार्या ग्राउंड काँक्रिटीकरण, वायर फिनिशिंग वॉल कंपाऊंड व जॉगिंग ट्रॅक कामाचे भूमिपूजन मा.ना.श्री.अनिलदादा पाटील ( मंत्री- मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य) यांचे शुभ हस्ते करण्यात आले*.
ओम शांती नगर भागातील स्थानिक नागरिक नवरात्रि मध्ये मोठ्या उत्सवांने सालाबादाप्रमाणे उत्सव याठिकाणी साजरा करतात त्यांच्या मागणीनुसार सदरच्या *कामांसाठी माजी नगरसेवक प्रताप आबा शिंपी यांनी पाठपुरावा करून काम मंजूर करण्यात आले होते. याकामी मुख्याधिकारी डॉ प्रशांत सरोदे, विक्रांत भास्करराव पाटील, विक्की आबा जाधव यांचे सहकार्य मिळाले.
भूमिपूजन कार्यक्रमास अनिल शिसोदे,एल. टि.नाना पाटील, बाळू पाटील, गौरव पाटील, यांचेसह लहू पाटील,भरत ठेकेदार, गुलाब गायकवाड, विलास आप्पा,श्रीराम मराठे, नवल पाटील, शांताराम पाटील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...!
