लोक न्यूज-
अमळनेर :- दि १३जून२०२३ रोजी तालुक्यातील सर्वं प्रथम सीबीएसई शाळा असलेल्या ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १०वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना स्वीट्स व गुलाबपुष्प देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड ललिता पाटील यांनी स्वीकारले. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक पराग पाटील देवश्री पाटील प्राचार्य विकास चौधरी सर उपस्थित होते.
   कार्यक्रमात अश्विनी चौधरी व देवयानी पाटील यांनी गणेश वंदना नृत्य स्वरूपात सादर केली. मागील वर्षातील १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
    विद्यार्थ्यांपैकी प्रगती गोसावी,दर्शन पाटील,संजीवनी पाटील व महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या स्थापनेपासुन कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ मंगला चौधरी व सौ सुरेखा सोनगडकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी सिनियर विद्यार्थ्यांनी 'ड्रामा विथ डान्स' आनंदमयी वातावरणात सादर केला. ॲड ललिता पाटील यांनी शाळेच्या प्रगतीसाठी झालेल्या संघर्षाची जाणीव करून देत धर्याने पुढे जाण्याची ताकद सर्वाना आपल्या मनोगतात स्पष्ट करून दिली.त्याच बरोबर शाळेच्या प्राचार्यांनी शाळेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  विलास पाटील सर यांनी मानले. आनंदमयी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.