लोक न्यूज-
अमळनेर :- येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. अनिल शिंदे आणि कार्योपाध्यक्षपदी प्रदीप कुंदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध निवड सदर नावे अधीच कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित झाली होती, काल संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत त्यांची निवड होऊन अधिकृत घोषणा दि.२ मे रोजी करण्यात आली. मावळते कार्याध्यक्ष हरी भिका वाणी आणि कार्योपाध्यक्ष संस्थेच्या योगेश मुंदडा यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवड करण्यात आली. दरम्यान सदर निवडीनंतर सत्कार सोहळा पार पडला. तेथे दोन्ही पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी मंचावर अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ. माधुरी पाटील, जितेंद्र देशमुख, विश्वस्थ सौ. वसुंधरा लांडगे, संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडा,
डॉ. संदेश गुजराथी, नीरज अग्रवाल, विनोदभैय्या पाटील, कल्याण साहेबराव पाटील व प्राध्यापक प्रतिनिधी, मुख्याध्यापक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रामाणिक प्रयत्नांची ग्वाही नूतन 'चेअरमन डॉ. अनिल शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मी ग्रामिण भागातील असताना जी. एस. हायस्कूल ला ७ वी त प्रवेश घेतला, तेथूनच खा. शि. मंडळाशी माझा संबंध आला, लहानपणी आई वारली त्यानंतर सर्व शिक्षकांनी मला घडविले, आणि आज आमच्या पॅनलच्या जेष्ठ श्रेष्ठ मंडळींनी मला योग्य समजून संस्थेच्या कार्याध्यक्ष पदावर बसविले हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. सर्व संचालक मंडळ यांचेही अनमोल सहकार्य मला लाभले, खरेतर खा. शि. संस्थेमध्ये चेअरमन होणे मोठी जबाबदारी आहे. आता शिक्षण पद्धती बदलत चालली आहे, ही राज्यातील नामांकित संस्था आहे. जनतेच्या या संस्थेकडून खूप अपेक्षा आहेत. त्यास सामोरे जाताना हार्ड वर्क करणे आवश्यक आहे तरच स्पर्धेत टिकू. विद्यमान संचालक मंडळाकडून आज संस्थेत बराच कायापालट झाला आहे, विकासासाठी पैसे आणि राजकीय पाठबळ अत्यंत आवश्यक असते, मी आशावादी माणूस आहे, काही करायचे असे चॅलेंज स्वीकारणे आवश्यक असते. आपल्याकडे सर्व आहे केवळ मेडिकल कॉलेज नाही याची खंत असून त्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू, शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यास बराच बदल होऊ शकतो, मागील वर्षी इंजिनिअरिंग, आयआयटी आणि मेडिकल नीटच्या अभ्यासक्रमासाठी प्रताप पॅटर्न सुरू केल्याने आपल्याकडील ग्रामिण विद्यार्थ्यांना तालुक्यातच या शिक्षणाची सोय झाली आहे. आता संस्थेत सर्व भरती प्रक्रिया नियमानुसारच होतात कारण शासनाने आता हात बांधले आहेत. खरेतर किचकट नियमांमुळे शिक्षण क्षेत्राची अवस्था सध्या वाईट आहे, खूपच कष्ट घ्यावे लागतात, आम्ही सर्व मिळून नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मला आता काही नको असून पुढील दहा वर्षे मी जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवासाठी देण्याचे ठरविले असून प्रताप शेठजींचा दुवा माझ्या पाठीशी असल्याने संधीचे सोनेच नक्कीच करणार अशी ग्वाही त्यांनी जाहीरपणे दिली.यावेळी माजी प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ्फ यांनी या संस्थेत डॉक्टरांची निवड ही चांगली गोष्ट असून मेडिकल कॉलेज आणण्याची त्यांची इच्छा आहे, तीच इच्छा माझीही आहे, आज काम करणारी दुसरी पिढी चांगली असल्याने निश्चितच संस्था पुढे जाणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यानंतर माजी कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, अर्बन बँकेचे माजी चेअरमन मुन्ना शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राचार्य तथा सेक्रेटरी प्रा. डॉ. अरुण कोचर यांनी केले.याप्रसंगी आशीर्वाद पॅनलचे नेते कुंदनलाल अग्रवाल, बजरंगलाल अग्रवाल, जि. प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील, माजी चेअरमन प्रवीण साहेबराव पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, मार्केट संचालक प्रा. सुभाष पाटील, सुरेश पिरन पाटील, प्रसाद शर्मा, रोटरी क्लब अध्यक्ष कीर्तीकुमार कोठारी, प्रा. दिलीप भावसार, नाना शुक्ल यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
