लोक न्यूज-
अमळनेर शहरातील हुशार व चालाख आणि दलाली करणारे तसेच शासकीय कामात अडथळा करून जिवेनीशी ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्फोटक पदार्थ व हत्यार जवळ बाळगून असा गुन्हेगार असलेला रफिक उर्फ काजल शेख रशीद वय वर्ष ३७ राहणार गांधलीपुरा अमळनेर.
अमळनेर पोलिसांनी आज एम. पी. डी. ए. ची चौथी कारवाई  रफिक उर्फ काजल शेख रशीद याच्यावर  केली असून त्यास अमरावती सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. रफिक उर्फ काजल याच्यावर आज पावतो दाखल पात्र एकूण ११ गुन्हे, अदखल पात्र एकूण ०६ गुन्हे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदे अंतर्गत एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) प्रमाणे हद्दपार एकूण ४ वेळेस तर एकूण ०५ वेळेस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सदरील आरोपीवर दाखल गुन्ह्यांपैकी प्रामुख्याने जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ जवळ बाळगून आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा करणे
सदर धोकादायक इसम हा हद्दपार करून तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच अनेक वेळा त्याचे चांगले वर्तणुकीचे बॉण्ड घेऊन देखील त्याचे तो पालन करत नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यास भीती राहिलेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीने त्याने लोकांची मालमत्ता व जीवित धोक्यात आणले होते.

रफिक उर्फ काजल शेख रशीद याच्यावर अमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे त्याच्या क्रूर कृत्यांना व खुनशी वृत्तीला असलेला आरोपीवर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यापासून अवघ्या पाच महिन्यात अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगारांवर ४ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. च्या कारवाई केली  आहे.
या कारवाई करताना प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे पोलीस अंमलदार किशोर पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे, सहा.पोलीस निरीक्षक श्री. राकेशसिंह परदेशी, PSI श्री. विकास शिरोळे, बापू साळुंखे, कपिल पाटील, सुनिल पाटील, योगेश श्रावण पाटील, घनशाम पवार, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील, मिलिंद बोरसे, नाजिमा पिंजारी, नम्रता जरे, होमगार्ड कैलास पाटील या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नजन पाटील साहेब यांची मदत आहे. तसेच त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये काम केले आहे.
जनतेस प्रताडीत करणारे व वेठीस धरणाऱ्या जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारांना परिणामकारक कारवाई केली पाहिजे यासाठी मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. एम राज कुमार साहेब यांनी तसे आदेश दिले होते. त्यावरून अमळनेर पोलिसांनी मा. अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री. रमेश चोपडे सर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर श्री. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.