लोक न्यूज-

साहेब...!
पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब म्हणजे आमच्या पूर्वजांना न उमगलेले कोड. आपली आधुनिक विचारसरणी - वैज्ञानिक दृष्टिकोन - शेती विषयक अभ्यास - निर्णय क्षमता या सर्व गोष्टी पासून अजाण राहिलेल्या आमच्या पूर्वजांनी आपल्याला ओळखण्यात कसूर केली आणि हा देश आपल्या सारख्या एका कर्तृत्ववान माणसाच्या हातात देण्यापासून मागे राहिले परंतु साहेब आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत होतो परंतु आपण निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला आयुष्याची ८० वर्ष ओलांडलेल्या व्ययक्तिमत्वाला एवढ्या मोठ्या प्रमाणात २१ व्या शतकातील तरुण युवक - युवतींचे प्रेम मिळत आहे या सारखे दुसरे उदाहरण या जगाच्या पाठीवर होऊ शकत नाही साहेब आपण घेतलेल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा हीच आर्त हाक...!


श्याम जयवंतराव पाटील
मा.सभापती - आरोग्य समिती अमळनेर नगरपरिषद , अमळनेर