वैजापूर- लोक न्यूज
येथील राजपूत युवक क्षत्रिय संघटनेची महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी करण्याच्या नियोजन बाबत युवकांची बैठक येथील राजपूत समाज मढी येथे
रविवार(ता,३०,एप्रिल,) रोजी घेण्यात आली,या बैठकीत माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यानी येत्या १४,मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होऊ घातलेल्या सकल राजपूत महामेळाव्या विषयी
सविस्तर माहिती व मान्यवरांकडे सादर करावयाच्या मागण्या बाबत माहिती दिली,हे एकुण सर्व युवक ऊत्साही झाले व त्यानी सपरिवार महामेळाव्यास उपस्थित राहण्याचा संकल्प केला,एव्हढेच नव्हे तर ईतर समाज.हितचिंतक याना ही मेळाव्यासाठी येणार असे जाहिर केले,या प्रसंगी बैठक आयोजक स्वप्निल राजपूत यानी वैजापूर यानी शहरातील व पंचक्रोशितील सर्वाना घेऊन येणार असे आश्वासन दिले,यानंतर धोंडीराम राजपूत यानी उपस्थिताना उपस्थित राहण्याची प्रतीज्ञा दिली,या प्रसंगी सागर राजपूत,सोनू राजपूत,स्वप्निल राजपूत,जितू राजपूत,भुजबळ,सचिन सुरजमल राजपूत,
संघटनेचे पदाधिकारी, मोठ्या सन्खेने उपस्थित होते.
