लोक न्यूज-
महाराष्ट्र शासनाने महिलांना बस प्रवासात 50% प्रवास सवलत जाहीर केल्याच्या निषेधार्थ अमळनेर मेन्स टॅक्सी चालक-मालक संघटना पदाधिकारी हे दि.23/03/2023 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.
त्यानंतर आज रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची स्वतः वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांना तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो असे आश्वासित करून समजूत घालून त्यांचे मन परिवर्तन केले व उपोषणकर्ते यांचे दि.23/3/2023 रोजी पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण दि.25/03/2023 रोजी मा.पो.नि.श्री.विजय शिंदे यांच्या प्रयत्नाने सोडविलेले आहे. 
    त्यानंतर  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे व नायब तहसीलदार श्री.लांडगे यांनी अमळनेर मेन्स टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्रित रित्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले