अमळनेर-लोक न्यूज
७५ वक्ते ७५ भाषणे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान मोहिमेअंतर्गत युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संस्थेमार्फत *शिव जयंती पंधरवाडा* या विशेष उपक्रमात विद्यार्थी, सिनिअर वक्ते यांनी विविध शाळा महाविद्यालये येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर व्याख्याने देऊन प्रबोधनांच कर्तव्य पार पाडले. त्या सर्व १०० मान्यवर वक्त्यांचा जाहीर सन्मान पी आय वासुदेव देसले, माजी सरपंच सुषमा देसले रोटरी क्लब अध्यक्ष कीर्ती कोठारी, अशोक बिऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी केले.अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी वक्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.७४ विद्यार्थी विद्यार्थिनी,२६ सिनिअर शिवव्याख्याते
प्राथमिक शाळा ४,माध्यमिक शाळा १५,ज्युनिअर कॉलेज २,समाज कार्य महाविद्यालय २ अश्याप्रकारे २३ शैक्षणिक संस्थामधून ७४ विद्यार्थी शिवव्याख्याते होते.
संगमनेर येथे कार्यरत असलेले मूळ अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र पी आय वासुदेव देसले यांनी विद्यार्थी वर्गाला उद्देशून महत्वपूर्ण भाषण केले, स्पर्धा परीक्षेत सुद्धा वक्तृत्व कलेचा वापर करता येऊ शकतो, वक्त्याला चौफेर अभ्यास करावा लागतो.यातून अभ्यासाची सवय जडली की आयुष्याचे कल्याण होऊ शकते.
शिव जयंती पंधरवाड्यात अमळनेर शहर आणि ग्रामीण भागात ६ हजार विद्यार्थी आणि २ हजारच्या वर नागरिकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयोगिता पोहचविण्याचा काम या १०० वक्त्यांनी केलं.
विद्यार्थी आणि सिनिअर वक्त्यांचा सत्कार मेडल( शिवरायांचं चित्र असलेल पदक) आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आला प्रसंगी सर्व विद्यार्थी वक्त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते.
सदरचे अभियान यशस्वी करण्यासाठी
अशोक बिऱ्हाडे,प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा डॉ राहुल निकम, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, सोपान भवरे ,अजय भामरे, गौतम मोरे ,प्रा.अशोक पवार
इ प्रबोधन चळवळीतील मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ लीलाधर पाटील यांनी केले.


