लोक न्यूज- मुंबई
मालविडे क्रिकेट क्लब, आगाशी (M.C.C)आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक १७/१८/१९ फेब्रृवारी २०२३ या तीन दिवस आगाशी पूरापाडा ग्राउंड वर भरवण्यात आले होते या स्पर्धेच्या आयोजना निमित्त प्रमूख पाहुणे म्हणून विरार चे उद्योजक राजा ठाकूर, महिला क्रिकेटपटु शरयु सावे, ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, राजन पाटिल, महेश म्हात्रे, रंजना ठालेकर असे मान्यवर उपस्थित होते.
मालविडे क्रिकेट क्लब ने आयोजन केलेल्या स्पधैची रूपरेषा एक गाव एक संघ, ओपन संघ तसेच वाडवळ समाज संघ अशी असून पारितोषीकांची रूपरेशा प्रथम पारितोषिक ५५,५५५/- व चषक, दुसरे पारितोषिक ३३,३३३/- व चषक, तिसरे पारितोषिक २२,२२२/- व चषक असून सामन्यांचे समालोचन करणारा समालोचक (कॅामेन्ट्रेटर) फार हुशार  आणि अनुभवी होता त्याने आपल्या बहुआयामी समालोचनानी सामन्यांची रंगत दुप्पट केली सर्व प्रेषकांना त्याने जागेवर खिळून ठेवले होते अंतिम सामन्यांत राजापूरचा संघ विजेता ठरला ,ह्या स्पर्धेच्या आयोजकांचे वैशिष्ठ सांगताना समालोचक म्हणाले की ह्या MCC क्रिकेट क्लब मंडळाला कुणी अध्यक्ष नाही तर सर्वजण पडेल ते काम इमानदारीने करतात आणि कार्य सिद्धीस नेतात हा गुण मला फार आवडला त्यांच प्रमाणे हे मंडळ सर्व थरातील माणसं जोडायला तयार असतात
या सामन्यांची पारितोषिक वितरण समारंभ १९ फेब्रृवारी सायंकाळी ७ वाजता पार पडला. यावेळेस सर्व मान्यवरांच्या हस्ते उत्क्रूष्ट फलंदाज, उत्क्रूष्ट यष्टीरक्षक, उत्क्रूष्ट गोलंदाज, उत्क्रूष्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिक देण्यात आली. 
मालविडे क्रिकेट क्लब च्या माध्यमातून वसई तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना पुढे चांगली संधी मिळावी व त्यांनी वसई तालूक्याचे नाव भारतात पुढे न्यावे असे प्रतिपादन ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केले तसेच स्पर्धेचे २ रे पारितोषिक देखील त्यांनी आपल्या हस्ते प्रदर्शित केले.