वैजापूर-लोक न्यूज
येथील पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साम्राटसिंह राजपूत यांची बदली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हेगारी शाखेत झाल्यामुळे त्यांना सोमवार(ता,६)रोजी पोलीस स्टेशन,पोलीस पाटील व संपूर्ण शहर व तालुका वाशीयांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला तर त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक म्हणून आलेले संजय लोहकरे यांचे
स्वागत करण्यात आले,कार्यक्रम अध्यक्षस्थानी आय,पी,एस, उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी होत्या तर मंचवर तहसीलदार राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती,येथे बीड हुन बदलुन आलेले पोलीस उप निरीक्षक पवन फुलसिंग राजपूत यांचे ही स्वागत करण्यात आले तर येथून रीडर म्हणून बदली झालेले श्रीराम काळे यांनाही निरोप देण्यात आला,सम्राटसिंह राजपूत यांनी कोरोना काळात,व पूर परिस्थिती काळात ,निवडणूक बंदोबस्त काळात उत्कृष्ट कर्तव्य पार पाडले म्हणून व खूप चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था राखल्या बद्धल तहसीलदार गायकवाड यांनी त्यांच्या कर्तव्याची प्रशवंसा केली, तर वैजापूर वासीयांनी दिलेल्या भरभरून सहकार्य बद्धल राजपूत यांनी व्यक्त केले,लोहकरे यांनी राजपूत साहेबांसारखे कर्तव्य पार पाडणार असे विशद केले,या प्रसंगी पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी व पो,कॉन्स्टेबल निरोप देताना अक्षरशः रडले,या निरोप समारंभ व स्वागत समारंभ चे सूत्र संचलन व आभार शांतता समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यानी केले त्यांना एल सी बी चे विजय घोटकर यांनी सहकार्य केले,माजी नगराध्यक्ष राजुसिंह राजपूत, दीपकसिंह राजपूत, उपसरपंच व राजपूत युवक क्षेत्रीय संघटना धीरज राजपूत प्रेम रजपूत,भाजपा शहंर अध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण, पो,पा संघटनेचे सूर्यकांत मोटे,वैजीनाथ जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष प्रकाश बोथरा,सचिव धोंडीराम ठाकूर,व्यापारी संघटनेचे काशिनाथशेठ गायकवाड, मजीद कुरेशी,प्रशांत त्रिभुवन, विलास म्हस्के, शैलेश खैरमोडे,गौरव धामणे,साहेबराव पडवळ, अमोल राजपूत,मान्सूरली,राजू चहावाले, कचरू राजपूत,शाहीर अशोक बागुल,भागवत कथा आयोजक राजू जोगीलाल राजपूत, भाऊलाल सोमासे,प्रेम राजपूत,शैलेश पोंदे,अण्णा साहेब ठेंगडे,यांनी ही निरोप दिला,तर पो,उप,निरीक्षक शेख,मनोज कुलकर्णी ,यांनी मनोगत व्यक्त केले.


