लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्वर्गीय आबासो एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयाचा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. 
एलिमेंटरी व इंटरमिजिएट सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्वर्गीय आबासो एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.  एलिमेंटरी परीक्षेत 32 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले. हर्षा दीपक पाटील ही विद्यार्थिनी ' ए 'श्रेणी तर, ओम धनगर, प्राची खैरनार, दिव्या खैरनार, राजश्री पाटील, साक्षी पाटील, कृतिका पाटील, तनिष्का पाटील, पुनम पाटील, प्रशांत पाटील, जयेश पाटील, रोहिणी पाटील, जानवी पाटील, ललिता पाटील हे सर्व विद्यार्थी 'बी 'श्रेणीत व १८ विद्यार्थी 'सी 'श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत १८ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, ते सर्व उत्तीर्ण झाले. सुहानी भास्कर पाटील व हर्षदा कमलेश पाटील या दोन विद्यार्थिनींना 'ए' ग्रेड श्रेणी मिळाली, यश पाटील, देवेंद्र पाटील, कल्पेश पाटील, मयूर पाटील, दर्शन पाटील, शुभम पाटील, जोगेश्वरी पाटील, कविता पाटील, जान्हवी पाटील, भाग्यश्री पाटील, प्रतीक्षा पाटील हया विद्यार्थ्यांना 'बी' ग्रेड श्रेणी व ५ विद्यार्थ्यांना 'सी 'ग्रेड श्रेणी मिळून उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक डी. आर. वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेतील अध्यक्ष माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील ,मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी कौतुक केले.