लोक न्यूज-
मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल अमळनेर येथे दिनांक 27/02/2023 रोजी राजभाषा मराठी दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस महाराष्ट्राचे लाडके मराठी कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच “कुसूमाग्रज" यांचा जन्म दिवस असतो. त्यांना गौरवपुर्ण मान देण्यासाठी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणुन साजरा केला जातो. वि.वा. शिरवाडकर श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणुन ओळखले जातात. कुसूमाग्रज या नावाने त्यांचे काव्यलेखन आहे. जीवनलहरी किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे. या व्यतिरीक्त त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकूट इत्यादी नाटक सामील आहेत.. सदर दिवशी मुंदडा ग्लोबल शाळेत मराठी भाषा गौरव दिन मराठीगीते, लोकगीते. वगनाटय, पोवाडा, लावणी असे विविध प्रकारे गाणे व नाटीका सादर करण्यात आले.. तसेच आमच्या UKG च्या चिमुकल्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले - सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लता मंगेशकर सचिन तेंडुलकर, आनंदीबाई जोशी, कुसूमाग्रज, बहिणाबाई चौधरी, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक व विठ्ठल यांच्या वेशभषा साकारल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे व मराठी दिवसाचे महत्व समजावुन सांगितले. तसेच मराठीत बोलाना ! याची प्रतिज्ञा देखिल घेण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक
श्री. युवराज चौधरी सर व श्री. आर. के. सोनार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री. योगेश मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

