लोक न्यूज-
 बोरगाव ता. अमळनेर येथील सुपुत्र इंजिनियर परेश यशवंत शिंदे  संचालक साई प्रसाद ग्रुप यांनी  सामाजिक बांधिलकी जोपासत गोवर्धन- बोरगाव येथील  जिल्हा परिषदेच्या शालेय विदयार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
     गोवर्धन- बोरगाव येथील दोन्ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विदयार्थ्यांना स्वखर्चातून सुमारे दीडशे मुलांना दप्तर,कंपास पेटी,पाटी, इतरत्र शैक्षणिक साहित्य इंजिनियर परेश शिंदे, डॉ. प्रशांत शिंदे, साई प्रसाद ग्रुप यांनी वाटप केले.
      दोन्ही गावातील शाळेत जाऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कार्यक्रमाला निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अमळनेर 
पुष्पमाला  दिलीपराव शिंदे, लोकनियुक्त सरपंच रेखाताई शिंदे,  माजी सरपंच श्यामकांत पाटील,  उपसरपंच प्रवीण पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  सरदार भिल,  मुख्यध्यापक  सौ. सनासे तसेच शिक्षक भरत पाटील,  पवार सर, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी गोवर्धन बोरगाव दोन्ही गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी परेश शिंदे व  डॉक्टर प्रशांत शिंदे यांचे समाजभिमुख कार्य केल्याबद्दल कौतुक केले.
 यावेळी रत्नमाला शिंदे, श्यामकांत पाटील,  परेश शिंदे, प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी  शुभम सोनवणे  व  दिनेश पाटील सहकार्य केले.