लोक न्यूज-
अमळनेर शहरातील प्राचीन व इतिहासकालीन दगडी दरवाज्याच्या पुढच्या एका बुरुजामध्ये प्राचीन काळापासून मातंग समाजाचे अराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या मागीर बाबांची मुर्ती स्थित होती परंतु सदर दगडी दरवाजा पाडून टाकण्यात आल्यामुळे मागीर बाबांची मुर्तीही उध्वस्त झाली होती तरी सदर दगडीदरवजा नवीन निर्माण करतेवेळी ज्या बुरुजावर व ज्या ठिकाणी मुर्ती स्थित होती त्याच ठिकाणी मांगीर बाबांची मुर्ती प्राणप्रतीष्ठा करून बसविण्यात व मुर्तीची जागा बदलू नये अशी विनंती होती परंतु स्थानिक पातळीवर विरोध' दर्शविण्यात आला होता.
तरी बहुजन रयत परीषद व अमळनेर तालुका मातंग समाजामार्फत लढा देण्यात आला. बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी मा. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदने दिलीत. पालिकेने पुरातत्व विभाग नाशिक येथे पत्रव्यवहार केला. तसेच ब.र. प. जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांनी नाशिक येथे जाऊन पुरातत्व विभागाशी संपर्क साधून या कामी यश मिळविले. असे आजरोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत बोलतांना म्हणाले.


