वैजापूर- लोक न्यूज
मानवी जीवनातील समस्या ,प्रश्न व अडचणीवरील समर्पक उत्तर म्हणजे रामायण कथा आहेत, ते बुधवार (ता,१५)रोजी आयोजित तुलसी रामायण कथेत बोलत होते,जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जातांना त्यातील उकल करण्यासाठी रामायण कथा मार्गदर्शक ठरतात असेही ढोक महाराज पुढे म्हणाले येथील श्री साई बहुउद्धेशिय सेवा भावी संस्थेने आयोजित केलेल्या श्री साई सच्चरीत पारायण सोहळ्या निमित्त या  रामायण कथा आयोजित केलेल्या आहेत, या प्रसंगी जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे,माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगांवकर,नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी, उपजिल्हा प्रमुख संजय पा,निकम,तालुका प्रमुख सचिन वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी महाराजांचे पूजन केले,, सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी करून आभार मानले, कैलास साखरे, विशाल संचेती यांनी उपस्थितांचे स्वागत केले,आरंभी
ढोक महाराज यांनी भगवा ध्वज फडकविला, व श्री, गणेश, प्रभू रामचंद्र, हनुमानजी,व महादेव पिंडीचे पूजन केले,  जेष्ठ नागरिक पी,एम,शिंदे,उत्तमराव साळुंके,रवींद्र अप्पा साखरे,प्रकाश शेठ बोथरा, काशिनाथशेठ गायकवाड,अखिल शेख, भगवान तांबे, सीताराम शेठ व्यवहारे,अशोक धसे, धोंडीराम ठाकूर यांनी द्वीप प्रज्वलित केले, मंडळाचे जितेंद्र चापानेरकर, प्रेम राजपूत,शैलेश पोंदे,सुधीर लालसरे,राजू लालसरे,मनोज दौडे,अण्णा अधिकार,अरुणा कुलकर्णी,प्रविणा वाळेकर,इला पालेजा,योगिता साखरे,संतोषी लालसरे,छाया भावसार यांनी सहभाग नोंदविला