लोक न्यूज-धुळे
 दिनांक 15/02/2023 रोजी खान्देश कॅन्सर रिसर्च सेंटर धुळे, गायत्री सोशल अॅण्ड वेलफेअर संस्था धुळे व भगिणी सेवा मंडळ समाजकार्य महाविदयालय चोपडा यांच्या संयुक्त विदयमाने कॅन्सर आजारा बद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे सर हे होते. व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणुन मा. दिप्ती गायकवाड मॅडम, श्रमराज्य पेपर चे संपादक अतुल पाटील सर, डॉ. भूषण वाणी, डॉ. राजेंद्र तीपनवर, डॉ. शकुंत कोठारी व गायत्री सोशल अॅण्ड वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत मोहन येशीराव, प्रा. गुंजाळ सर, प्रा. देशपांडे मॅडम त्या नंतर या प्रमुख अतिथींचा गुलाव पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष भामरे सर यांनी कॅन्सर विषयी मार्गदर्शन केले. कॅन्सर होण्याची कारणे, कॅन्सर निदानाच्या पध्दती, कॅन्सर वर उपलब्ध असलेले उपचार पध्दती खान्देश कॅन्सर रिसर्च सेंटर तर्फे कॅन्सर रुग्णांना विविध सेवा उपलब्ध आहेत. त्या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्याच्या मार्गदर्शनात सोशल वर्कर ची भुमिका काय आहे, कॅन्सर रुग्ण आणि डॉक्टर यातला दुवा महणजेच वर्कर होय. व सोशल वर्कर हा खान्देश रिसर्च सेंटर ला कॉन्सीलर म्हणुन कसा काम करु शकतो हे त्यांच्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. त्यानंतर खान्देश कॅन्सर रिसर्च सेंटर चे डॉ. भूषण वाणी यांनी कॅन्सर आजार कसा होतो, व कॅन्सर आजाराच्या कशा स्टेप असतात व कोणत्या स्टेप ला कॅन्सर आजार निदर्शनास आला तर बरा होऊ शकतो, हे त्यांच्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. व त्यानंतर डॉ. शकुंत कोठारी सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनात रेडीऐशन विषयी सखोल माहिती दिली. त्यानंतर डॉ. राजेंद्र तीपनावर सर यांनी खान्देश कॅन्सर रिसर्च सेंटर विषयी संपूर्ण माहिती दिली. व त्यांनी सांगितले की, या कॅन्सर रिसर्च सेंटर मध्ये 160 कर्मचारी कार्यरत आहेत. व कॅन्सर रिसर्च सेंटर मध्ये एकूण पाच मजले आहेत उत्तर महाराष्ट्रात कॅन्सर रुग्णांना चांगली सेवा देणारे एकमेव खान्देश कॅन्सर रिसर्च हे आहे असे सांगितले. या प्रसंगी मा. अतुल पाटील सर यांनी खान्देश कॅन्सर रिसर्च सेंटर चे विषेश कामकाजाची माहिती दिली. तसेच कर्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी उपस्थिती देवून सामाजिक कार्यकर्त्यांना कॅन्सर आजारा बद्दल मार्गदर्शन केले. हा फार मोठा दुग्धशर्करा योग आहे. डॉ. सुभाष भामरे सरांनी अनेक वर्ष कॅन्सर रुग्णांना व इतर रुग्णांना सेवाभावि पध्दतीने सेवा पुरविल्या आहेत. हे सर्व धुळे करांना ज्ञात आहे. असे सेवाभावि व्यक्तीमहत्वाने आज सामाजिक कार्यकत्यांशी कॅन्सर या विषयावर सुसंवाद सादला हे समाजिक कार्यकर्त्यांचे भाग्य आहे. खान्देश कॅन्सर रिसर्च सेंटर च्या सुविधांचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दामिनी केंद्राचे समुपदेशक रोशनी सैंदाणे, गायत्री शिरसाठ, जयश्री लहामगे, ममता जगताप व समाजकार्य महाविदयालयाच्या विदयाथांनी विषेश परिश्रम घेतले.