लोक न्यूज-
अमळनेर पोलीस स्टेशन दि.०४/०२/२०२३
अमळनेर पोलीसांनी केली सराईत गुन्हेगारास अटक सविस्तर हकीगत अशी की, आरोपी विशाल विजय सोनवणे रा. फारशी रोड, अमळनेर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लोखंडी फायटरने मारहाण केली व कमरेस लावलेले पिस्टल फिर्यादीच्या कपाळावर लावुन फिर्यादींच्या खिशातून १००० रु काढुन घेतले होते. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. २८/२०२३ भा.द.वि. कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दि. २६/०१/२०२३ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासुन विशाल विजय सोनवणे हा फरार होता.आज रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांना मिळालेल्या माहीतीवरून विशाल विजय सोनवणे हा निर्जन स्थळी लपुन बसला आहे. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी मिळालेल्या माहीती वरुन तात्काळ पोउनि, श्री. विकास शिरोडे, पोहेकॉ/सुनिल जाधव, पोहेकाँ/चंद्रकांत पाटील, पोना/हिरालाल पाटील, पोका/ सागर साळुंके, पोको/राहुल चव्हाण,चापोका/सुनिल पाटील अश्यांचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले. सदरील पथकाने निर्जन स्थळी विशाल विजय सोनवणे यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी विशाल विजय सोनवणे यास वरील नमुद गुन्ह्यात अटक करून मा न्यायालय अमळनेर येथे तपासी अधिकारी पोउपनि विकास शिरोळे यांनी हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.विशाल सोनवणे याचा पुर्व इतिहास पाहता तो अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर लोकांना दहशत घालणे, गंभीर जखमी करणे, जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

