अमळनेर: लोक न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती चा उत्सव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी प्रा अशोक पवार अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सर्व जाती धर्मासाठी राज्य करणाऱ्या छत्रपतींना अश्याच पद्धतीच समाजात ऐक्य अपेक्षित होत. आणि त्याला साजेशा कार्यक्रम आज मुस्लिम बांधवांनी आयोजित करून आजच्या बिघडत चाललेल्या वातावरणाला सकारात्मक दृष्टी देऊन समाजात चांगला संदेश दिला आहे.
प्रथम छात्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरात आज हा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम घडवून आणला जात असताना अनेकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी ऍड शकील काझी,फाहिम तेली,मनोहर निकम, सुभाष चौधरी यांनीही प्रासंगिक मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमास
बन्सीलाल भागवत,अशोक बिर्हाडे सर, गौतम मोरे, नगर सेवक नरेंद्र (राजा) संदानशिव,सुरज परदेसी, नितीन नीळे, ऍड. तिलोत्तमा पाटील,कल्पना मोरे,डाॅ.एम.आर,दौकिया, रामराव पवार,पन्नालाल मावळे, शेखर भावसार,बाळा साहेब पवार,दादा पवार,विशवास महाराज,मोहन भोई,रणजित शिंदे सर,अमोल माळी सर,महेन्द्र बोरसे,प्रशांत भाऊ,भरत पवार, सुनील सर,जितू सर संदानशिव, प्रवीण संदानशिव, पत्रकार बंधू ,उमेश धनराळे, संजय पाटील, जितू ठाकूर, नूरखान,रोहित भटेजा,अकबर शहा, अजय भामरे, मुख्तार खाटीक, सुलतान खान,इम्रान खाटीक,रहिम मिस्तरी,सैय्यद हाशम अली, अ. जब्बार दादा, इकबाल क़ुरेशी,युसूफ पेंटर,शहारुख सिंगर, अहमद अली,शब्बीर मामु,आबिद अली,सफदर भाई,रशिद भाई, जाकीर शेख , जलाल भाई,रशिद खाटीक,एजाज शेख,अख्तर अली,शब्बीर भाई,मुशारत अली,दिलावर काझी,सिकंद्दर शेख,मुकतार शेख,रफिक शेख, आकीब शेख, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कृष्णा संदानशिव यांनी केले तर आभार ऍड रज्जाक शेख यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक रियाज शेख होते.


