लोक न्यूज-
43वे धुळे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन धुळे मधील St.ANN'S ENGLISH SCHOOL DHULE या ठिकाणी आयोजित केले असून साने गुरुजी माध्यमिक विद्यालय अजंदे बुद्रुक येथील विद्यार्थी कुमार दिपेश ईश्वर परदेशी इयत्ता 8वी याचा आमच्यासाठी 'गणित या विषया अंतर्गत ' 'झटपट आकृती गणन*" या विज्ञान उपक्रमाला उच्च प्राथमिक गटातून  प्रथम क्रमांक चे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते मिळाले. तसेच झटपट आकृती गणन या उपक्रमाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. 
शाळेचे मुख्याध्यापक  श्री आर. एल. सोनवणे सर, यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातही ह्या उपक्रमाला प्रथम पारितोषिक प्राप्त व्हावे आणि धुळे जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गौरवान्वित करण्यासाठी शुभेच्छा
दिल्या आहेत."