लोक न्यूज- मुंबई
मानवतां फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केलेल्या आव्हानाला महाराष्ट्र राज्यातील बर्याच अशा सामाजिक संस्था व समाजकर्ते यांनी पूढाकार घेवून आम्हाला जमेल त्या स्वरूपात मदत केली. सध्याच्या थंडीच्या काळामध्ये रस्त्यावर वास्तव्य करणार्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. मूबंई, नवी मूंबई तसेच विरार व अर्नाळा परिरासह ठिक ठिकाणी मानवता फांऊंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर राहणार्या गरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आली. मानवतां फाउंडेशन कडून होत असलेल्या या सर्व कार्यक्रमाचे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कौतूक होत असून मदती साठी बर्याच संस्था पूढे येत आहे त्यांचे आभार अध्यक्ष यांच्या कडून व्यक्त करण्यात आले.




