वैजापूर-लोक न्यूज
शेगाव संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन निमित्त आयोजित श्री, गजानन विजय चरित्र पारायण ला पहिल्या दिवशी शुक्रवार(ता,१०)रोजी मोठी गर्दी झाली तीनशे  महिला पारायणार्थी तर पंधरा पुरुष परायनार्थी बसले आहेत, सुंदर गणपती मंदिर येथे शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस  सकाळी हे पारायण तर सायंकाळी सात ते नऊ प्रवचन व कीर्तन होणार आहे,सोमवारी गजानन महाराज प्रकट दिन आहे,या दिवशी  प्रतिमा व ग्रंथ मिरवणूक आहे,या साठी श्री गजानन महाराज भक्त परिवार व उत्सव समिती सर्वश्री काशिनाथ आगाज ,संतोष बोथरा, धोंडीरामसिंह राजपूत,श्रावण चौधरी,श्याम पवार,राजू पुणे,गणेश धुमाळ,निशिकांत पवार,बाळू पुणे, आदित्य वडनेरे,कुणाल जगताप,मंगलताई जगताप,श्रीमती सोनदे,गणेश अनर्थे सहभाग नोंदवीत आहेत.