लोक न्यूज-
शंकर आधार पाटील रा. शारदा कॉलनी, वड चौक, अमळनेर हे दि. ०८/०१/२०२३ रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावरुन त्यांचे मित्र नंदु गणेश चव्हाण यांच्या सह चहा पिवुन परत येत असतांना रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांने शंकर पाटील व त्यांचे मित्र यांना चाकुचा धाक दाखवुन तुमच्या खिश्यात किती पैसे आहेत, ते मला द्या नाहीतर मी तुला चाकुने मारुन टाकेल असे बोलत त्याच्या हातातील चाकुने शंकर पाटील यांच्या उजव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या पायाला वार करुन जखमी केले. खिश्यातील ७८००/- रुपये बळजबरीने काढुन पळुन गेला म्हणुन अमळनेर पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांतील रमण बापु नामदास ह्याने हा गुन्हा केल्या पासुन फरार झाला होता व त्याचा शोध पोलीस पथक कसून तपास करत होते. त्यांनतर पो. नि. श्री. विजय शिंदे, अमळनेर पोलीस स्टेशन यांना गोपनिय माहीती मिळाली की,रमण बापु नामदास रा.मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर हा अमळनेर शहरात रेल्वे स्टेशन परीसरात लपुन बसला आहे. त्यावरून पो. नि. शिंदे यांनी पोउनि विकास शिरोळे, सफी. रामकृष्ण कुमावत, पोहेकॉ. किशोर पाटील, पोना. डॉ. शरद पाटील, पोना, दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील, पोना. सिध्दांत सिसोदे, पोना कैलास पवार अश्यांचे पथक तयार करुन रमण बापु नामदास यास ताब्यात घेण्या साठी रवाना केले. नमुद पथकाने रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांस रेल्वे स्टेशन परीसरात अत्यंत शिताफिने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. पो.नि.विजय शिंदे यांनी रमण बापु नामदास रा.मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यांस गुन्ह्यांकामी अवघ्या दोन तासात अटक करण्यात आली. व नमुद गुन्ह्यांचा तपास सफौ. रामकृष्ण कुमावत करीत आहेत.
आरोपी रमण बापु नामदास रा.मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर याचे बाबत अमळनेर पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळला असता त्याचेवर यापुर्वी देखील अमळनेर पोलीस स्टेशला १ ) गु.र.न. ४३९/२०१९ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे व २) गु.र.न. ४६९/२०१९ भा.द.वि. कलम ३९४, ५०६, ४२७ प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पो. नि. श्री. विजय शिंदे यांचे गोपनिय बातमीच्या आधारावर व मार्गदर्शनाखाली पौउनि विकास शिरोळे, सफी. रामकृष्ण कुमावत, पोहेकॉ. किशोर पाटील, पोना. डॉ. शरद पाटील, पोना. दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील, पोना. सिध्दांत सिसोदे, पोना. कैलास पवार यांच्या पथकाने केली आहे.

