लोक न्यूज-
सविस्तर घटना अशी की,
जैतपीर ता.अमळनेर येथील ईश्वरसिंग उत्तमसिंग परदेशी वय 68 शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे नातेवाईकाचे लग्न वैजापुर जि. औरंगाबाद येथे दिनांक 18/01/2023रोजी असल्याने ते वैजापुर येथे दिनांक 17/01/2023 रोजी वैजापुर जि. औरंगाबाद येथे गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्याने ते दिनांक 20/01/2023रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास येवला मार्गे जानारी एस टी बस मध्ये बसले व दिनांक 20/01/2023रोजी सकाळी 11/45 वा.  येवला एस टी स्टैंड येथे उतरले त्यानंतर ते अमळनेरसाठी अमळनेर जानारी एस टी बस ची वाट बघत होते.येवला एस टी स्टैंड येथेच एक अज्ञात इसम त्यांच्या जवळ येउन त्याना म्हणाला की काका तुम्हाला तिकडे उभे असलेले सांहेबानी बोलवले आहे असे सांगुन त्यांना बसस्टँन्ड चे बाजुला घेउन जाउन म्हनाला की काका तुमच्या अंगावरिल सोन्याचे दागिने काढुन द्या आणी तुमच्या खिशातील कागदपत्रे रुमाल मी तुमचे कडे तुमच्या रुमालात बाधुन देतो त्यावेळी त्यांनी त्यांच्या अंगावरिल 20 ग्राम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन व 7 ग्रॅम वजनाची सोन्याची उजव्या हातातील बोटातील अंगठी असे सोन्याचे दागिने वरिल अज्ञात इसमाच्या हातात काढुन दिले व अज्ञात इसमाने त्याच्या हाताने त्यांच्या अंगावरिल दागिने काका मी काढलेले दागिने तुमच्या पिशवीत ठेवतो असे सांगुन निघून गेला. त्यांनतर ते परत येवला बसस्टैंड येथे आले. ईश्वरसिंग परदेशी अमळनेर जाणे करिता बसमध्ये बसले व मी येवला पास होताच माझे पिशवी मध्ये अज्ञात इसमाने येवला एस टी स्टैंड येथे काढलेले दागिन्यांची पिशवीत हात घालून खात्री केली असता त्यांना ते मिळुन आले नाही त्यावेळी त्यांना समजले  की येवला एस टी स्टँड येथे एक अज्ञात इसमाने माझे गळ्यातील 20 ग्रामची चैन व 7 ग्रॅम वजनाची सोन्याची उजव्या हातातील बोटातील अंगठी असे सोन्याचे दागिने अज्ञात इसमाने काढुन घेतले.म्हणून ईश्वरसिंग परदेशी यांच्याशी घडलेली घटना नुसार येवला पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्या नुसार  येवला पोलीस स्टेशन येथे 420 प्रमाणे गुन्हा अज्ञात इसमा वरती नोंद करण्यात आला आहे.API नितिन खंडाने साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार पुढील तपास पो.हे.पैठणकर करीत आहेत.