लोक न्यूज-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त पोलाद स्टील यांच्या सौजन्याने तारांगण व आकाशगंगा यांचा थ्रीडी शो दाखवण्यात आला.
     सर्व प्रथम मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी प्रतिमपूजन केले. यावेळी अशोक सुर्यवनशी , प्रभूदास पाटील , संजय पाटील ,राजेंद्र पाटील , सीमा मोरे ,सुषमा सोनवणे हजर होते. विद्यार्थ्यांना सुर्यमालेतील ग्रहांचे भ्रमण ,त्यांच्यावरील वातावरण , सूर्यापासून पृथ्वीपासून अंतर , वजन ,कक्षा , पाण्याचे अस्तित्व , दिवस रात्र कालावधी आदी माहिती थ्रीडी चित्रपटातून देण्यात आली. त्यामुळे मुलांना भौगोलिक ज्ञान मिळून ग्रहांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा दूर झाल्या. याकामी राहुल पाटील ,मनोज पाटील ,प्रदीप पाटील,सुदर्शन पवार  खुशाल पाटील ,पवन पाटील , योगेश पाटील , हेमराज सोनवणे यांचे सहकार्य लाभले.