लोक न्यूज- नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ २०२४ च्या जून महिन्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे लोकसभेची आगामी निवडणूक नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढविली जाईल हे आता स्पष्ट झाले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला. भाजपच्या सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला एकमुखाने मान्यता दिली. नड्डा आता जून २०२४ पर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून
कार्यरत राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२४ मध्ये आणखी मोठ्या बहुमताने विजयी होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे मत अमित शाह यांनी यावेळी बोलताना केले. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करतील, असेही ते म्हणाले.
२० जानेवारीला मुदत संपत होती जेपी नड्डा यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ २० जानेवारीला संपणार होता. नड्डा यांना जुलै २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते.

