वैजापूर-लोक न्यूज
ज्यांना देशात शांतिदुत व धर्मरत्न म्हणून ओळखल्या जाते ते महंत श्री, देवकीनंदन ठाकूर जी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकण्यास संपूर्ण औरंगाबाद जिल्हा आतुर झालेला आहे,श्रीमद भागवत कथा शुक्रवार(ता,२०)पासून आरंभ होत आहे, या भागवत कथा ची तैयारी वैजापूर शहरात जीवनगंगा परिसरात पूर्ण झाली असून या कार्यक्रमाच्या नियोजन बाबत कल्पना देण्यासाठी मंगळवार(दि.१७)रोजी उत्सव समितीचे अध्यक्ष राजूसिंह जोगीलाल राजपूत,कार्याध्यक्ष भावलाल काका सोमासे व कोषाध्यक्ष गोकुळ राजपूत यांच्या उपस्थितीत संपन्न झाली,धोंडीरामसिंह राजपूत यांनी
गठीत करण्यात आलेल्या समित्याची कार्य विस्ताराने विशद केली,व सात दिवशीय कार्यक्रमाचे नियोजन सादर केले,शुक्रवार(ता,२०)रोजी श्री, देवकीनंदन ठाकूर महाराजांचे आगमन शहरात होत असून ,त्यांची रथातून भव्य मिरवणूक या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली आहे, या मिरवणुकीत उंट,लेझीम पथक,भजनी मंडळ, व कलशधारी महिला असणार आहेत,सदरील मिरवणूक डॉ,बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे,समित्यांचे पदाधिकारी वर्गाने करावयाची कामे यांना सांगण्यात आली, भव्य दिव्य मंडप उभारला असून पंधरा एकर परिसरात आसन व्यवस्था करण्यात आली आहे,पन्नास हजार भक्त बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे,बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांची निवास व्यवस्था करणार आहेत,या प्रसंगी नियोजक प्रेम राजपूत,नगरसेवक गणेश खैरे,दिनेश राजपूत,कैलास साखरे,पारस घाटे, गोकुळ भूजबळ
सोनू राजपूत,मनोज राजपूत,शैलेश पोंदे,बंकटसिंह राजपूत,प्रल्हाद राजपूत, प्रमोद राऊत,गणेश चंदवाडे,
नवीन श्रीवास्तव,ऍड,संदीप डोंगरे,अशोक आप्पा पवार,सोमु सोमवंशी,चंद्रपाल राजपूत,धीरज राजपूत यांच्या सह शहरातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते