लोक न्यूज-
अमळनेर तहसिलदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
आता अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेत 2-3 रु किलोऐवजी मोफत धान्य...
सर्व जनतेस सुचित करण्यात येते की केंद्र शासनाने जानेवारी 2023 पासून अन्न सुरक्षा
कायद्याखाली दिले जाणारे धान्य 1 वर्षा पर्यंत मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार..
दिनांक 1 जानेवारी 2023 पासून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये दिले जाणारे धान्य 1 वर्षापर्यंत मोफत दिले जाईल. हे धान्य देताना त्यांची स्वतंत्र पावती दिली जाईल या धान्याची उचल करताना लाभार्थ्याचे स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण (इ-पॉस मशीनवर वेगळ्याने अंगठा देणे) करावे लागेल. सर्व लाभार्थ्यांना यापूढे वर्षभर उपरोक्त धान्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत याची नोंद घ्यावी.

