लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे काल एका तरुणाच्या अंगावर ट्रॅक्टर चालविल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.17 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
मांडळ येथील जयवंत यशवंत कोळी (वय-36)हा लौकी नाला परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. सकाळी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने ते जबर जखमी झाल्याची माहिती गावात एकाने दिल्यानंतर जयवंत कोळी यांना नातेवाईक व ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक डॉक्टर यांच्याकडे उपचारासाठी नेले.जयवंत कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी हलविले. मात्र काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मृत जयवंतची पत्नी शुभांगी कोळी हिच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक लखा कोळी, विशाल अशोक कोळी, सागर अशोक कोळी, विनोद अशोक कोळी, रोहन बुधा पारधी, पिटु शिरपुरकर पुर्ण नाव माहित नाही सर्व रा. माडंळ असे नाल्यातुन रेती भरत होते त्यावेळी जयवंत कोळी यांनी अशोक लखा कोळी यास म्हणाले कि तुम्ही रात्रीच्या वेळी तो भरत जावु नका तुमच्या रेती वाहतुकीमुळे रस्तादेखील खराब झाला आहे या रस्त्याने तुमची वहीवाट नाही असे बोलून त्याचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर जयवंत याने परत केले होते. त्याचा राग मनात धरुन त्या दिवसापासून अशोक लखा कोळी हा आमच्याशी द्वेश भावनेने पाहत होता.
जयवंत कोळी यांनी दोन दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर अडविले होते.यातूनच वाद झाल्याचीही चर्चा आहे.आज घटनादरम्यानही वाद झाल्याचे सांगण्यात येत असून यातच ही घटना घडली असल्याची चर्चा आहे. हा अपघात आहे की खून असा संशय व्यक्त होत असून घटना स्थळी मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी जावून पाहणी केली. काल रात्री 9 ते आज दि.17 रोजी सकाळी 7.30 वा. दरम्यान पती जयवंत कोळी शेतात एकटे असतांना त्यांना संगणमताने फावड्याने मारहाण करून फावड्याने त्यांच्या गुप्तभागावर मारून तोडुन दुखापत करून त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर नेवून त्यांना जिवेठार केले आहे.असा गुन्हा मयत जयवंत कोळी यांच्या पत्नी शुभांगी कोळी यांनी वरील सहा लोकांविरुद्ध दिला आहे.
प्रतिक्रिया...
एम.राजकुमार
पोलीस अधीक्षक,(एस.पी.)जळगाव...
मारवड पोलीस स्टेशनला जे गुन्हे दाखल केले आहेत. डॉक्टरांच्या रिपोट नुसार फावळ्या ने शरीराच्या गुप्तभागावर मारहाण केली आहे.
म्हणून मृत्यू झाला आहे.302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी ताब्यात आहेत पुढील तपास सुरू आहे.
जनतेतून प्रतिक्रिया....
महसूल विभागाने वाळूमाफियांना वेळीच अटकाव केला असता तर जयवंत कोळीचा जीव गेला नसता...
महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा थैमान....
प्रतिक्रिया
तहसिलदार... मिलिंद वाघ,अमळनेर
अमळनेर तालुक्यामधील वाळू बाबतच्या तक्रारींवर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना बैठकीस बोलावून सूचना देण्यात आलेले आहेत याबाबत कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे कामात हलगर्जी केल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याबाबत सर्वांना सक्त सूचना देण्यात आलेले आहेत तसेच ग्रामस्तरावरील ग्रामस्तरीय समित्या यांनाही लेखी पत्राद्वारे त्वरित वाळू वाहतुकी अटकाव करण्याबाबतच्या उपयोजना करण्याबाबत पत्र देण्यात येत आहे.


