लोक न्यूज-
अमळनेर येथील युवावक्ता व विधिज्ञ अॅड. सारांश धनंजय सोनार यांचा अमळनेर वकील संघातर्फे न्यायाधीशांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्र सरकारच्या संसद सचिवालयाने आयोजित स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सेंट्रल हॉलमध्ये अॅड. सारांश यांनी नुकतेच भाषण दिले. त्याबद्दल हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून दिल्लीत गौरव प्राप्त करणाऱ्या अॅड. सारांश सोनार यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी, जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशपांडे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. अग्रवाल, न्यायाधीश एस. एस. जोंधळे, न्यायाधीश अमिता यादव यांनी सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी अॅड. एस. आर. पाटील, अॅड. रमाकांत माळी, अॅड. अशोक बाविस्कर, अॅड. प्रदीप भट, सचिव अॅड. राजेंद्रकुमार कचवा, अॅड. के. आर. बागुल, अॅड. यज्ञेश्वर पाटील, अॅड. आर. व्ही. निकम, अॅड. सुशील जैन, अॅड. शशिकांत पाटील, अॅड. विलास वाणी, अॅड. शकील काझी, अॅड. संदीप बोरसे, अॅड. गोपाळ सोनवणे, अॅड. आर. टी. सोनवणे, उपाध्यक्ष अॅड. विवेकानंद चौधरी, अॅड. यू. टी. सोनवणे, अॅड. जे.यू. बडगुजर, अॅड. पी. ए. पाटील, अॅड. नंदकुमार सूर्यवंशी, अॅड. आर. बी. चौधरी, अॅड. जे. पी. साळी, अॅड. आर. ए. निकुंभ, अॅड. गोपाल अग्रवाल, अॅड. अशोक बोरसे, ॲड. के. व्ही. कुलकर्णी, अॅड. सलीम खान, अॅड. एस. एस.

ससाने, अॅड. कुंदन साळुंखे, अॅड. किरण पाटील,उपस्थित होते.