ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया प्रशिक्षण देताना प्रशिक्षण प्रमुख धोंडीरामसिंह राजपूत, तहसीलदार राहुल गायकवाड, किरण कुलकर्णी, हेमंत उशीर,व मनीष दिवेकर
लोक न्यूज
वैजापूर -औरंगाबाद
तालुक्यातील २५ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य या पदासाठी मतदान दि,१८ डिसेंबर २०२२रोजी होणार आहे त्या साठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी १,२,३ यांना शनिवार(ता,०३)रोजी
पंचायत समिती सभागृहात तहसीलदार राहुल गायकवाड,व नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण प्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी या अधिकारी वर्गाने पार पाडव्याच्या कर्तव्ये विषयी प्रशिक्षण दिले, त्यांची कर्तव्ये,त्यांच्या
जबाबदाऱ्या,ई, व्ही,एम, बाबत ही माहिती दिली,या निवडणुकी साठी२५ग्रामपंचायत क्षेत्रातील ७७ प्रभागातील २२५जागांसाठी निवडणूक होणार,सरपंच
थेट मतदारातून निवडण्यात येणार आहे, तहसीलदार राहुल गायकवाड यांनी व शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर यांनीही ही नियुक्त अधिकारी वर्गाला
मार्गदर्शन केले,या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी हेमंत
उशीर,प्रशिक्षण विभागाचे एस, आर,दुशिंग,श्री वाघ,संतोष जाधव,श्री पुंड,सचिन गायकवाड,नितीन गवळी यांनी सहभाग नोंदविला.
