वैजापूर-लोक न्यूज
तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना गेल्या २०-२२वर्षापासून बंद आहे,या कारखान्याचे कर्मचारी गेल्या २० वर्षांपासून थकीत वेतन मिळावे म्हणून लढा देत आहेत,परंतु या कर्मचारी वर्गाच्या लढ्याची आजपावेतो कोणीही दखल घेतली नाही,साखर आयुक्त,सहकार मंत्री याना भेटून ही उपयोग झाला नाही , ,शेवटी ही संघटना मा,उच्च न्यायालयातधाव घेण्यात आली,मा,उच्च न्यायालायने वेतन अदा करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र अद्यापही या कर्मचारी वर्गाला थकीत पगार नाही ,गेल्या २०वर्षांपासून हे साखर कामगार कसा बसा आपला उदर निर्वाह करीत आहेत,शासनाचे या मागणी कडे लक्ष वेधण्यासाठी हे साखर कामगार आपल्या कुटुंबीयसोबत येथील उपजिल्हाधिकारी कार्यलय समोर आमरण उपोषण ला सोमवार(ता,२६)पासून
आमरण उपोषणाला बसलेले आहे, कुटुंबीय धरून जवळपास २००साखर कामगार आमरण उपोषण
करत आहेत), तालुका पेंशनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपुत,यांनी या साखर कामगार उपोषण स्थळी भेट देऊन त्यांना पाठींबा दिला, या समयीअध्यक्ष एस, जी, भराडे,मराठवाडा ई,पी,एस, निवृत्त कर्मचारी संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष भास्कर
मतसागर ,उपाध्यक्ष ए,डी ,चव्हाण,सचिव जयराम उगले, व यांच्या सर्व कुटुंबीय कामगार सुध्दा उपोषणात सहभागी झालेले आहेत.
