रिया वाणी


              मितेश जेठवा

लोक न्यूज-
क्रिडा व युवक सेवासंचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रिडाअधिकारी कार्यालय जळगांव व धुळे व्दारा आयोजीत केलेल्या बुध्दीबळ व कॅरम स्पर्धेत मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल, अमळनेर येथील विद्यार्थ्यांनी शानदार यश संपादन करत विभागीय स्तरावर विजय मिळवून राज्यस्तरावर आपले स्थान पक्के केले व आपल्या यशाची परंपरा आबाधीत राखली.

जळगांव येथे झालेल्या बुध्दीबळ खेळाच्या विभागीय स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मितेश जेठवा या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकविला असुन त्याची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. व धुळे येथे झालेल्या कॅरमच्या विभागीय स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात रिया वाणी या विद्यार्थीनीने चौथा क्रमांक पटकविला असुन तीचीदेखिल राज्यस्तरासाठी निवड झाली आहे..

या खेळांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील क्रिडा शिक्षक श्री. विनोद पाटील, श्री. पंकजराव पाटील, श्री हेमंत जाधव व श्री यज्ञेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यस्तरावर निवड झाल्या बद्दल सदर दोन्ही विद्यार्थी व क्रिडा शिक्षक श्री. यज्ञेश जगताप यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री योगश मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका अमेय मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षिक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर विद्यार्थी व शिक्षिकांचे कौतुक केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.