लोक न्यूज-
 दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी न्यू व्हिजन   इंग्लिश मीडियम  स्कूल मध्ये ख्रिसमस डे आणि साने गुरुजी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली .
 साने गुरुजींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन  करण्यात आले.
 दिपाली राजपूत यांनी खरा तो एकची धर्म हि प्रार्थना म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली.
सर्व धर्मसमभाव या आपल्या भारतीय संस्कृतीचा मान राखून  शाळेमध्ये सर्व सन -उत्सव आनंदाने साजरे केले जात असतात.
 म्हणूनच शाळेत ख्रिसमस डे चेही आयोजन जोरदार करण्यात आले. 
 कार्यक्रमात  विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या  पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
 यावेळी शाळेत  ख्रिसमस ट्री वर लायटिंग लावून ते सजवण्यात आले. ख्रिसमस निमित्त शाळेत  सजावट करण्यात आली.
 कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर   नृत्य  सादर केले. शाळेच्या प्राचार्य  प्रेरणा पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 शाळेचे चेअरमन  निलेश लांडगे व अध्यक्ष शितल देशमुख तसेच शाळेच्या प्राचार्य प्रेरणा पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थ्यांनी केले.
 ख्रिसमस  डेनिमित्त सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




 
.